इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरनं (SAC) तंत्रज्ञ पदासाठी एक सूचना पोस्ट केली आहे. त्या ठिकाणी 34 ओपनिंग्ज आहेत. याव्यतिरिक्त, ISRO प्रोपल्शनसाठी महेंद्रगिरी आणि SDSC SHAR केंद्रांतली पदं भरण्यासाठी आता नियुक्ती केली जात आहे.
इस्रो तांत्रिक सहायक आणि ड्राफ्ट्समन फॉर्म 2023 :
www.isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर इस्रो तंत्रज्ञ भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज सबमिट करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचं पुनरावलोकन करणं गरजेचं आहे. वेबसाइटवर पोस्ट केलेल्या अधिकृत घोषणेमध्ये शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, पात्रता अटी आणि इतर माहितीसह भरतीशी संबंधित सर्व माहिती आहे. लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.
advertisement
अर्ज भरण्याची मुदत : तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समन या पदांसाठी 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येतील. अधिकृत नोटीसमध्ये भरती चाचणीशी संबंधित महत्त्वपूर्ण तारखांचा समावेश आहे.
पदांची संख्या : तांत्रिक पदवीधर आणि डिप्लोमाधारकांना इस्रोच्या अनेक विभागांमध्ये विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात. या भरती मोहिमेत 35 पदं भरली जातील. त्यापैकी 34 तंत्रज्ञ 'बी' पदांसाठी असतील आणि एक ड्राफ्ट्समन 'बी' पदासाठी असेल. एकूण जागांपैकी काही जागा विशिष्ट वर्गातल्या अर्जदारांसाठी राखीव आहेत.
पात्रता : इच्छुक उमेदवार 18 ते 35 या वयोगटातला असावा. तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समनच्या पदांसाठी उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किंवा कम्प्युटर सायन्समधली BE/B Tech पदवी किंवा समतुल्य पदवी मिळवलेली असणं गरजेचं आहे. त्यांना किमान 6.84 सीजीपीए किंवा 65 टक्के गुण असले पाहिजेत.
ऑनलाइन अर्ज कसा भरावा?
इस्रो भरती परीक्षा 2023ला बसू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना भरती प्रक्रियेत नाव नोंदवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
स्टेप-1 : isro.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप-2 : होमपेजवरच्या मेन्यूमधून स्टुडंट्स कॉर्नर हा ऑप्शन निवडा.
स्टेप-3 : ड्रॉप डाउन मेन्यूमधून करिअर ऑप्शन निवडा.
स्टेप-4 : 'ISRO तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन भरती 2023साठी अर्ज' अशी लिंक शोधा.
स्टेप-5 : 'क्लिक टू अॅप्लाय' बटणावर क्लिक करा.
स्टेप-6 : आवश्यक असलेली सर्व माहिती भरा.
स्टेप-7 : सर्व माहिती तपासा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
स्टेप-8 : शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
आवश्यक शुल्कासह यशस्वीरित्या फॉर्म सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रत आपल्याकडे ठेवली पाहिजे. कोणत्याही खोट्या तपशीलामुळे उमेदवारी रद्द होऊ शकते.
लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असेल?
90 मिनिटांची लेखी परीक्षा असेल. त्यामध्ये प्रत्येक अचूक उत्तरासाठी एक गुण असणारे 80 बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरावर 0.33 गुण वजा केले जातील. लेखी परीक्षा झाल्यानंतर पात्र उमेदवारांची स्किल टेस्ट घेतली जाईल.