कसा सुरू झाला प्रवास?
जालना जिल्ह्यातील मंठा गावची रहिवासी असलेल्या नितीन राठोड यांना कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करायचं होतं. म्हणून त्यांनी डेयरी फार्म सुरू करण्याचं ठरवलं. 200 गाईपासून त्यांनी आपल्या फार्मची सुरुवात केली. यासाठी नाशिक, नगर जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांकडून गाई खरेदी केल्या. सुरुवातीला आपल्याच दुधापासून प्रक्रिया उद्योग सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र काही शेतकऱ्यांकडून त्यांना तुमच्या प्रक्रिया उद्योगाचा आम्हाला काय फायदा? अशी विचारणा होऊ लागली. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांकडून देखील दूध घेण्यास सुरुवात केली. सध्या या ठिकाणी तब्बल सात हजार लिटर दुधावर प्रक्रिया होऊन वेगवेगळे पदार्थ तसेच, वेगवेगळ्या प्रकारचे फॅट असणारे दूध संपूर्ण मराठवाडाभर विकले जाते.
advertisement
देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं इन्स्टंट आईस्क्रीम कधी खाल्लं का? असं काय आहे स्पेशल? VIDEO
हायटेक डेयरी फार्म
नितीन राठोड यांच्याकडे लहान मोठे असे एकूण 400 जनावरे आहेत. या गाईपासून मिल्किंग होण्यापासून ते पाऊचिंग होण्यापर्यंत संपूर्णपणे आधुनिक पद्धतीने तसेच कुठल्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप न करता उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांची विक्री करण्यासाठी राठोड यांच्याकडे सहा छोट्या तर दोन मोठ्या गाड्या आहेत. आत्याधुनिक यंत्रणेचा वापर केलेला असल्यामुळे केवळ पंधरा कामगारांच्या जोरावर हा हायटेक डेअरी फार्म चालतो.
ऐन सणासुदीच्या काळात खव्याच्या दराला घरघर, पाहा काय आहे कारण Video
महिन्याला 80 लाखांचा टर्नओव्हर
आमच्या इथे सकाळी पाच वाजल्यापासून मिल्किंगचे नियोजन सुरू होतं. गाई दुधाला जातात तेव्हा त्यांना चारा टाकला जातो. चाऱ्यासाठी तब्बल वीस एकर वर नेपियर चाऱ्याची लागवड करण्यात आली. गाई दुधावरून आल्यानंतर चाऱ्यावर येतात त्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आलेली आहे. चाऱ्यामध्ये आम्ही त्यांना मका देतो. त्याचबरोबर मुरघास असतो. नेपियर चाऱ्याची व्यवस्था देखील आम्ही केली आहे. सर्व जनावरांची व्यवस्था पाहण्यासाठी दोन व्हेटर्नरी डॉक्टर 24 तास उपलब्ध असतात. या प्रोसेसिंग प्लांट वर दररोज सात हजार लिटर दुधाची प्रक्रिया होते. दर महिन्याला इथे 80 लाखांच्या आसपास टर्न ओवर होतो, असं नितीन राठोड सांगतात.