ऐन सणासुदीच्या काळात खव्याच्या दराला घरघर, पाहा काय आहे कारण Video

Last Updated:

ऐन सणासुदीच्या काळात खव्याच्या दरात घसरण झाली आहे.

+
News18

News18

जालना, 16 ऑक्टोबर : सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. या काळात मिठाईची मागणी वाढलेली असते. मिठाईसाठी लागणारा खवा जालना शहरातील जुना मोंढा भागात मिळतो. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे खवा मार्केटचे दिवस आहेत. मागील अनेक पिढ्यांपासून हे मार्केट प्रसिद्ध आहे. इथे शेतकरी अस्सल दर्जाचा खवा घेऊन येतात. सर्वसामान्यपणे शेतकऱ्यांनी आणलेल्या खव्याला 300 ते साडेतीनशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. मात्र, सध्या सणासुदीचा काळ सुरू असून देखील खव्याला 180 ते 220 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. त्यामुळे या काळात खवा खरेदी करण्याची सुवर्णसंधी सर्वसामान्य नागरिकांना असणार आहे. मात्र, सध्या खव्याच्या दरात का झालीये घसरण हे आपण विक्रेत्यांकडून जाणून घेऊया...
काय झाली घसरण?
आमचा वडिलोपार्जित खवा निर्मितीचा व्यवसाय आहे. मागील अनेक वर्षांपासून मी जालना शहरात खवा घेऊन येत आहे. इथे खव्याला दरही चांगला मिळतो. मात्र, काही दिवसांपासून बाहेरून केमिकल युक्त खवा शहरात येत असल्याने आमच्या उच्च दर्जाच्या खव्याचे दर देखील कमी झाले आहेत. आमच्या दुधाला 80 ते 90 रुपये दर मिळतो मात्र तरीदेखील आम्ही खवा तयार करून तो मार्केटला आणतो यासाठी खूप मेहनत असते मात्र मार्केटला आल्यानंतर 180, 190 ते 220 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे आमची मेहनत वाया जात आहे. आमची सरकारला विनंती आहे की, केमिकल युक्त खव्याची विक्री करणाऱ्या वर कारवाई करावी, असं खवा विक्रेते राजू काटकर यांनी सांगितलं.
advertisement
परवडत नाही
मी मागील 50 वर्षांपासून खवा विक्रीचा व्यवसाय करतो सरासरी खव्याला 250 ते 300 रुपयांचादर मिळतो. मात्र, सध्या दरामध्ये घसरण झाली आहे. आता 180, 210 ते 220 रुपयांच्या दरम्यान खवा विक्री होत आहे. जसा भाव मिळेल त्या पद्धतीने विक्री करावीच लागते. खरंतर हे परवडत नाही. मात्र दुसरा पर्याय देखील नाही. चांगला भाव मिळाला तर परवडते नाहीतर काहीच उरत नाही असा माझा अनुभव आहे. आमचा हा पारंपारिक व्यवसाय असल्याने त्यातून काही फायदा हो अथवा न हो आम्हाला हा व्यवसाय करावाच लागतो. जालना मार्केट हे खव्यासाठी अतिशय उत्तम आहे. अतिशय उत्तम उच्च दर्जाचा खवा इथे मिळतो. आता थोड्याफार प्रमाणात मिक्स करून खवा आणला जातोय मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचं वरखेडा येथील शेतकरी देविदास आघाव यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
ऐन सणासुदीच्या काळात खव्याच्या दराला घरघर, पाहा काय आहे कारण Video
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement