देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं इन्स्टंट आईस्क्रीम कधी खाल्लं का? असं काय आहे स्पेशल? VIDEO

Last Updated:

शुद्ध देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं आईस्क्रीम पुण्यात मिळत आहे.

+
News18

News18

पुणे, 24 ऑक्टोबर : आईस्क्रीम म्हंटल की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण आईस्क्रीम आवडीने खातात. यामध्ये ही अनेक प्रकारचे फ्लेवर उपलब्ध आहेत. हे बनवताना काही अंशी प्रमाणात केमिकलचा देखील वापर केला जातो. यामुळे बऱ्याच वेळा शरीराला त्रास देखील होतो. यामुळे पुण्यातील शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शुद्ध देशी गाईच्या दुधापासून केमिकल मुक्त इन्स्टंट आईस्क्रीम तयार केले आहे. यामध्ये एकूण 12 फ्लेवरच आईस्क्रीम बनवलं जात. ते बनवण्याची नेमकी पद्धत काय आहे याबद्दलच विद्यापीठातील तांत्रिक देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख धीरज कणखरे यांनी माहिती दिली आहे.
कशी झाली सुरुवात?
तांत्रिक देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यामध्ये आम्ही शास्वत देशी गो पालणाचा विचार करून गेल्या काही महिन्यापासून इन्स्टंट आईस्क्रीम आमच्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ सुरु केलं आहे. थोड्याशा गुंतवणूकीमध्ये आम्ही याची सुरुवात केली. सध्या सगळीकडे केमिकलचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तो विचार करून आम्ही केमिकल मुक्त आईस्क्रीम बनवलं. यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर केला जात नाही,असं धीरज कणखरे सांगतात.
advertisement
कशी बनते इन्स्टंट आईस्क्रीम
देशी गाईच दूध घेऊन ते अटवतो. त्यामध्ये थोडी साखर मिक्स केली जाते. काही सीझनल फळ कृषी महाविद्यालयातील आहेत ती घेऊन त्या फळाचा गर काढून आईस्क्रीम बनवलं जात. यामध्ये 12 फ्लेवर मिळतात. यामध्ये ओरिओ, बोर्बन, बनाना, चिकू, आंबा, अंजीर, सीताफळ, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, बदाम, बटर स्कॉच, पान अश्या वेगवेगळ्या फ्लेवरचा समावेश आहे.
advertisement
नोकरी पेक्षा व्यवसाय भारी, ठाण्यातील मराठी तरुणीन सुरू केला मिसळ कट्टा
हे आईस्क्रीम इन्स्टंट बनत असल्यामुळे ते पार्सल नेता येत नाही. याची किंमत देखील कमी आहे. फक्त 50 रुपयेमध्ये हे आईस्क्रीम तुम्हाला खायला मिळेल. याची चव देखील तेवढीच अप्रतिम अशी आहे, असं धीरज कणखरे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं इन्स्टंट आईस्क्रीम कधी खाल्लं का? असं काय आहे स्पेशल? VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement