नोकरी पेक्षा व्यवसाय भारी, ठाण्यातील मराठी तरुणीन सुरू केला मिसळ कट्टा

Last Updated:

सुशिक्षित बेरोजगारी ही मोठी समस्या असली तरी ठाण्यातील तरुणीने एक वेगळा आदर्श निर्माण केलाय.

+
नोकरी

नोकरी पेक्षा व्यवसाय भारी, ठाण्यातील मराठी तरुणीन सुरू केला मिसळ कट्टा

ठाणे, 23 ऑक्टोबर: सुशिक्षितांची बेरोजगारी ही एक मोठी सामाजिक समस्या झाली आहे. काही तरुण स्वत:चा व्यवसाय सुरू करून त्यावर मात करतात. आपण अशा तरुणांची उदाहरणे ऐकली असतील. पण सध्या तरुणीही स्वत:चा व्यवसाय सुरू करून स्वत:च्या पायावर उभ्या राहात आहेत. ठाण्यातील निकिता पाटील ही अशीच एक 22 वर्षीय तरुणी आहे. बीएससीचं शिक्षण घेतलेल्या निकितानं स्वत:चा मिसळ कट्टा सुरू केला असून तिच्या मिसळला खवय्यांची चांगली पसंती मिळत आहे.
ठाण्यातील निकिता पाटील ही मराठी मुलगी आहे. कोरोना काळात तिचं बीएससीचं शिक्षण झालं. या शिक्षणावर नोकरी मिळणं अवघड होतं. त्यामुळं निकितानं नोकरीचा शोध घेण्याऐवजी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिला खाद्यपदार्थांच्या व्यवसायात रुची होती. त्यामुळे तिनं मिसळ कट्टा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असं ती सांगते.
advertisement
कुटुंबीयांकडून सुरुवातीला विरोध
निकिताच्या निर्णयास सुरुवातीला घरातूनच विरोध झाला. 22 वर्षीय मुलीनं व्यवसाय करण्याऐवजी नोकरी करावी असंच त्यांचं मत होतं. कमी वयाची मुलगी स्वतःचा असा व्यवसाय कसा करणार? भांडवल कसं तयार करणार? जेवण कसं बनवणार? ते विकणार कसं ? अशा अनेक प्रश्नांचा विचार पाटील कुटुंबीय करत होतं. अशा सगळ्या प्रश्नांचा विचार न करता या मराठमोळ्या मुलीने ठाण्यातील सत्कार ग्रांड या ठिकाणी एक मिसळचा गाडा उभा केला.
advertisement
40 रुपयांत भरपेट नाश्ता
निकिता स्वतः सकाळी सात वाजता हा बावरी मिसळ कट्टा उघडते. स्वतःही एक विद्यार्थी असल्यामुळे ती ही मिसळ अगदी 40 रुपये प्लेट या किमतीत विकते. विद्यार्थी वर्गाला भूक भरपूर असते. पण कमी खर्चात एक वेळचा भरपेट नाश्ता देता यावा असा विचार आपण केल्याचे निकिता सांगते.
advertisement
घरगुती मसाल्यांचा वापर
कुठलेही पाश्चात्य पदार्थ न विकता निकिता स्वतः तयार केलेली मिसळ या ठिकाणी विकते. येथे वापरण्यात येणारे मसाले हे सर्व घरगुती असल्यामुळे मिसळीला देखील अगदी घरगुती चव असल्याची माहिती येथील खवय्ये देतात. वय कमी पण हिम्मत मोठी असल्यामुळे कुटुंबीयांनी अखेर पाठिंबा दिला. निकिताने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. उत्कृष्ट प्रतिसादामुळे दिवसाला अनेक प्लेट या ठिकाणी विकल्या जातात.
advertisement
मुलींसाठी प्रेरणादायी
निकिताचे स्वप्न आहे की पुणे नाशिक प्रमाणेच मुंबईच्या मिसळची ही प्रसिद्धी वाढावी. त्यासाठी तिचा हातभार लागावा. मुलगी ही फक्त 9 ते 5 नोकरी न करता व्यवसाय करूनही सेटल होऊ शकते. असा सल्ला तिने पालक वर्गाला दिला आहे. निकिताचा हा प्रवास नक्कीच तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
नोकरी पेक्षा व्यवसाय भारी, ठाण्यातील मराठी तरुणीन सुरू केला मिसळ कट्टा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement