गुजराती कुंभारवाड्यात मराठी मुली; कसं करतायत गरबा सजावट काम पाहा Video

Last Updated:

नवरात्रात सजवलेल्या मडक्यांना अधिक मागणी असते.

+
News18

News18

कल्याण, 7 ऑक्टोबर : नवरात्र हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. यावेळी गुजराती मंडळी सजवलेलं मडक विकत घेतात. या मडक्यात दिवा ठेवला जातो. त्यानंतर या मडक्याला गरबा असे म्हणतात. तर मराठी मंडळी या सजवलेल्या मडक्यात धान्य उगवण्यासाठी ठेवतात. घागर किंवा मडक हे शुभ प्रतीक आहे. नऊ दिवस तेवत राहणारा दिवा या मडक्यात ठेवला तर तो विझत नाही अशी देखील एक समजूत आहे. म्हणून नवरात्रात सजवलेल्या मडक्यांना अधिक मागणी असते. सध्या या मडक्यांच्या सजावटीचं काम कल्याण पश्चिम परिसरातील गुजराती कुंभारवाड्यात केले जात आहे. या मडकी आकर्षक पद्धतीने सजवल्या असून नवरात्रासाठी मडकी घेण्याची कल्याण डोंबिवलीच्या गर्दी झाली आहे.
गुजराती कुंभारवाड्यातून मडकी विक्रीला
देवीचा सण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नवरात्रासाठी मडकी बनवण्याचे काम कल्याण पश्चिम परिसरातील गुजराथी कुंभारवाड्यातून केले जाते. हि मडकी विक्रीसाठी कल्याण डोंबिवलीच्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. येथील अनेक कुटुंबे मडकी घडवण्याचे व रंगरंगोटीचे काम करत आहेत. विशेष म्हणजे गुजराती कुंभारवाड्यात मराठी मुली काम करतात यामुळे त्यांना रोजगार मिळतो. 10 ते 20 रुपयांनी यंदा मडक्याचे दर वाढले आहेत. यंदा हंडीला चांगली मागणी असल्याचे धनाजी कुंभार यांनी सांगितले.
advertisement
विविध रंगांनी सजवले आकर्षक मडकी 
नवरात्रात वापरले जाणारा माठ आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे. त्यावर आरसे, मणी, लेस लावून ते सजवले आहेत. ॲक्रालिकच्या विविध रंगांनी डिझाईन देखील रेखाटली आहे. या कलरफुल माठामध्ये दिवा ठेवला जातो त्यावर वरती झाकण देखील ठेवले जाते. यामुळे दिवा विझण्याची शक्यता कमी होते. तर या मडक्याला डिझाईन केली असल्याने माती टाकून त्यात धान्य देखील उगवण्यास मदत होते.
advertisement
असे बनवले जाते मडके
जवळपास दोन महिने आधीपासून मडके बनवण्याचे काम सुरू आहे. या मडक्याची किंमत देखील माठाच्या आकारावर ठरवलेल्या आहेत. मोठे मडके 100 रुपयांपासून पुढे विक्रीसाठी आहे. त्यात कलाकुसर कशी केली आहे त्यावर ही किंमत ठरवली जाते. हे मडके बनवण्यासाठी उल्हास नदी जवळून माती आणली जाते. त्यानंतर माती मोल्डमध्ये टाकून तो माठ हाताने बनवला जातो. त्यानंतर भट्टीत टाकून त्यानंतर त्यावर रंग रंगोटी केली जाते अशी माहिती कुंभार यांनी दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
गुजराती कुंभारवाड्यात मराठी मुली; कसं करतायत गरबा सजावट काम पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement