Video : नवरात्रीत अशुभ सांगितलेला रंग घालावा का? काय होईल परिणाम?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवरात्रीत जर एकदा रंग तुमच्यासाठी अशुभ सांगितला गेला असेल तर, तो रंग घालावा की नाही? जाणून घ्या
वर्धा, 6 ऑक्टोबर : नवरात्री हा सर्वांचा आवडता उत्साहाचा आणि जल्लोषाचा सण आहे. विशेषतः महिलांसाठी हा सण विशेष मानला जातो. या दिवसांमध्ये आई जगदंबेची आई भवानीची आराधना, उपासना केली जाते. महिलांमध्ये नवरात्रीचा एक अनोखा उत्साह बघायला मिळतो. त्याचं एक कारण म्हणजे रोज वेगवेगळे ठरवून दिलेले रंग. ठरवून दिलेल्या रंगांचे वस्त्र परिधान करण्याची आवड प्रत्येक महिलेसह पुरुषांनाही असते असते. मात्र जर एखादा रंग तुमच्यासाठी अशुभ सांगितला गेला असेल तर, तो रंग घालावा की नाही? नवरात्रीत तो रंग परिधान केल्याने काय परिणाम होऊ शकतो? यासंदर्भात वर्धातील महाराज राजू टप्पे यांनी माहिती दिली आहे.
नवरात्रीत सर्व रंग शुभ
खरंतर नव रंगांची उधळण करण्याचा हा सण आहे. आई जगदंबेला हळदीकुंकू लावून तिला साडी चोळी नेसवून हिरव्या बांगड्या आणि ओटी भरून प्रसन्न करण्याचे हे नऊ दिवस असतात. त्यामुळे नवरात्रीत परिधान केले गेलेल्या सर्व रंग हे शुभच असतात. जर एखादी रंग तुम्हाला अशुभ सांगितला गेला असेल तरी तो नवरात्रात परिधान केल्यास काहीही अशुभ नाही, असे राजू टप्पे महाराज सांगतात.
advertisement
आवडीचे रंग परिधान करण्याचा वेगळा आनंद
सामान्यतः नवरात्रात काळा रंगाचे कपडे परिधान केले जात नाही. मात्र त्या व्यतिरिक्त सर्व रंग वापरले जातात. नवरात्रीत नवरंग शुभ फळ देणारेच असतात. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या रंग अशुभ सांगितला गेला असेल आणि तरीही त्या रंगाचे कपडे नवरात्रीत परिधान केले तर त्याचं फळ चांगलंच मिळेल. प्रत्येकाला आपल्या आवडीचे रंग प्रधान केल्यामुळे मानसिक समाधान लाभते हे महत्त्वाचे, असं राजू टप्पे यांनी सांगितले.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
October 06, 2023 2:54 PM IST

