गुजरातच्या कच्छची दाबेली कधी खाल्ली का? पुण्यात एकाच ठिकाणी घ्या 6 प्रकारचा आस्वाद
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गुजरातमधील कच्छची ऑथेंटिक दाबेली पुण्यात मिळत आहे.
पुणे, 23 ऑक्टोबर : पुण्यामध्ये वेगवगेळ्या प्रकारचे स्ट्रीट फूड प्रसिद्ध आहेत. या स्ट्रीट फूडचा खवय्ये आवडीने आस्वाद घेत असतात. दाबेली पुण्यातील एक स्ट्रीट फूडचा भाग आहे. तुम्हाला प्रत्येक चौकात दाबेलीचा एक स्टॉल दिसतो आणि कित्येक वेळा या ठिकाणी तुम्ही दाबेली खाल्ली देखील असेल. पण त्यातच आता गुजरातमधील कच्छची ऑथेंटिक दाबेली पुण्यात मिळत आहे. या दाबेलीला खवय्याची मोठी पसंती मिळत आहे.
एकाच ठिकाणी सहा प्रकार
पुण्यातील अलका चौक जवळ अजिंक्य जामोडेकर हे दाबेलीची फ्रेंचायजी चालतात. त्याचाकडे ऑथेंटिक दाबेली मिळते. यामध्ये बटर दाबेली, जैन दाबेली, गार्लिक दाबेली, चीझ दाबेली असे वेगवगेळ्या प्रकारचे सहा प्रकार मिळतात. या दाबेलीचा खवय्ये आवडीने आस्वाद घेतात.
नोकरी पेक्षा व्यवसाय भारी, ठाण्यातील मराठी तरुणीन सुरू केला मिसळ कट्टा
मांडवी म्हणून एक गाव आहे तिथे ही सर्वात आधी ऑथेंटिक दाबेली तयार झाली आणि एका कच्छच्या व्यक्तीने बनवली आहे. दाबेलीला गरम न करता कची खाल्ली जाते. परंतु पुण्यामध्ये याला कच्छी दाबेली म्हणतात तर कच्छमध्ये याला डबल रोटी म्हणतात. सध्या दाबेलीची फ्रेंचायजी मी चालवत आहे. ही दाबेली बनवण्यासाठी आम्ही शेंगदाणे, मसाले हे सर्व कच्छ वरून मागवतो. आमच्याकडे बटर दाबेली, जैन दाबेली, गार्लिक दाबेली, चीझ दाबेली, चिझ बटर दाबेली आणि ऑथेंटिक दाबेली मिळते, असं अजिंक्य जामोडेकर सांगतात.
advertisement
काय आहे किंमत?
दाबेली हा तसा सर्वांचा आवडता पदार्थ आणि ही ऑथेंटिक दाबेली खायला देखील तेवढीच टेस्टी आहे. दाबेलीची किंमत देखील कमी अगदी 20 रुपयांपासून ते 60 रुपयापर्यंत आहे, असं अजिंक्य जामोडेकर सांगतात.
कुठं खाल?
कुलकर्णी पेट्रोल पंपच्या मागे कुमठेकर रोड अलका चौक पुणे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 23, 2023 4:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
गुजरातच्या कच्छची दाबेली कधी खाल्ली का? पुण्यात एकाच ठिकाणी घ्या 6 प्रकारचा आस्वाद