जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर ग्रॅज्युवेट टी स्टॉल आहे. जगन्नाथ आघाव यांचा हा स्टॉल आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार हे त्यांचं मुळ गाव आहे. ते शिक्षण झाल्यानंतर नोकरी करत होते. पण, त्यामध्ये त्यांना स्थिरता मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी हा चहाचा स्टॉल सुरू केला आणि त्यांचं नशीब बदललंय. आता लाखोंची कमाई ते करत आहेत.
advertisement
मित्राचा तो सल्ला ऐकला अन् गड्याचं आयुष्यच बदललं! आज महिन्याला होतोय तब्बल इतका नफा
'मी अनेक ठिकाणी नोकरी केली. या नोकरीमध्ये आपला उदारनिर्वाह होणार नाही, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी चहाचा स्टॉल टाकण्याचं ठरवलं. माझ्या या कल्पनेना नातेवाईकांनी मोठा विरोध केला. मला ही गोष्ट जमणार नाही, असं त्यांचं मत होतं. नातेनाईकांच्या दबावामुळेच मला गावात स्टॉल सुरू करता आली नाही.
लॉकडाऊनमध्ये Youtube ची मदत, केक बनवण्याचं सुरू केलं काम, आज महिलेच्या उत्पादनांना मोठी मागणी
घरातील विरोधानंतरही मी हा व्यवसाय सुरू करण्यावर ठाम होतो. मी जालन्यात हा स्टॉल सुरू केला. आता रोज 4 हजारांची कमाई होत असून त्यामध्ये 2 हजारांचा नफा होतो', असं जगन्नाथ यांनी सांगितलं. 'इथं अतिशय चांगला चहा मिळतो. हा आमचा नेहमीचा स्टॉप झालाय. तुम्हीही जालन्यात आल्यावर या चहाची चव नक्की घ्या', अशी प्रतिक्रिया या स्टॉलचे नियमित ग्राहक अभिषेक बडगे यांनी दिलीय.