सोलापूर: जिद्द, चिकाटी आणि मेहनतीनं प्रयत्न केल्यास कोणतंही यश मिळू शकतं. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या तरुणानं हेच दाखवून दिलंय. मोहोळ तालुक्यातील हराळवाडीच्या विवेक परमेश्वर हराळे यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठं यश मिळवलंय. विवेकची राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण
advertisement
विवेकचे वडील परमेश्वर हराळे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्याचं प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा शाळा गुंजेगाव येथे झालं. तर माध्यमिक शिक्षण श्री अमोगसिद्ध प्रशाला कोरवलीत झालं. पुढील पदवीचे शिक्षण सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात घेतल्यानंतर त्यानं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.
मुलांना शिकवायचं होतं, लाज न बाळगता 'ती' रस्त्यावर उतरली! आज जगतेय अभिमानाने
4 वर्षांच्या प्रयत्नांतून यश
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विवेकने 2019 मध्ये पुणे गाठलं. तिथं 4 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला एमपीएससी परीक्षेत यश मिळालं. . 2019 पासून तो स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत होता. 4 वर्षांच्या प्रयत्नानंतर विवेकला यश मिळालं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य विक्रीकर परीक्षेत विवेकनं राज्यात 41 वा क्रमांक प्राप्त केला. त्याच्या या यशाबद्दल हारळवाडीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
सोलापूरच्या बुलेटवाल्यानं अशी सुधारली चूक, पोलिसांनीही केलं त्या निर्णयाचं कौतुक, Video
अभ्यासात सातत्य ठेवल्याने मिळालं यश
"प्रशासनामध्ये काम करण्याची आवड असल्याने मी एमपीएससी हेच क्षेत्र निवडलं. हा प्रवास 2019 पासून सुरु केला होता. हा यशाचा टप्पा गाठायला मला 4 वर्षे लागली. यासाठी मी खूप मेहनत आणि कष्ट सोसले. पण मनात जिद्द असल्याने व सातत्य टिकवून ठेवल्याने आज यशस्वी होऊ शकलो. आजच्या तरुणांनी सोशल मीडिया पासून लांब राहावे. आपले ध्येय गाठावे, असे आवाहनही विवेकने केले आहे. या यशात विवेकला मोठे बंधू प्रा. गणपत हराळे, वडील परमेश्वर हराळे, भाऊ बाळासाहेब हराळे, प्रा.नवनाथ हराळे, ज्ञानेश्वर हराळे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.