सोलापूरच्या बुलेटवाल्यानं अशी सुधारली चूक, पोलिसांनीही केलं त्या निर्णयाचं कौतुक, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पण शहरात एका तरुणाच्या कृतीचं कौतुक होतंय.
प्रसाद दिवानजी, प्रतिनिधी
सोलापूर : वाढत्या शहरीकरणामुळे अनेक शहरे प्रदूषणाच्या सावटखाली आहेत. सोलापूर शहरात देखील असंच काहीसं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. विनापरवाना वाहन चालवणे आणि कागदपत्रांची पूर्तता नसलेल्यांवर कारवाई होत आहे. तसेच कर्णकर्कश सायलेन्सर लावून रस्त्यावरून गाडी फिरवणाऱ्यांवरही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पण या सर्वात सोलापूरच्या एका दुचाकीस्वाराच्या भूमिकेचं पोलिसांनीही कौतुक केलंय.
advertisement
अतिशचं का होतंय कौतुक?
काही तरुण दुचाकीचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवतात. त्याचा वयोवृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना त्रास होत असतो. पण त्याकडे दूर्लक्ष करत कर्णकर्कश आवाज करत गाड्या पळविल्या जातात. सोलापुरातील अतिश शिंदे या तरुणानेही आपल्या बुलेट गाडीला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर बसविला होता. परंतु, त्याच्या चूक लक्षात आली. त्यामुळं गाडीचा सायलेन्सर काढून त्यानं स्वत:च पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याच्या या भूमिकेचं पोलिसांनीही कौतुक केलं.
advertisement
काय म्हणाला अतिश?
"सोलापूर शहरातील नागरिकांना आपल्यामुळं त्रास होणं योग्य नाही. त्यासाठी मी सायलेन्सर काढून पोलिसांना दिला. वाहतूक शाखेचे पोलीस दिवसरात्र अनेक गाड्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. अशा कारवाईला कुणीही बळी पडू नये. आपल्यामुळं शहरवासियांना त्रास होण्यापेक्षा पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. शहरातील इतरांनीही अशीच भूमिका घेऊन पोलिसांना सहकार्य करावे," असे आवाहन अतिश शिंदे यांनी केले आहे.
advertisement
पोलिसांचं आवाहन
सोलापुरात कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवून गाडी फिरवल्यास कारवाई होणार आहे. अतिश शिंदे यांनी स्वत:हून सायलेन्सर जमा केला. त्यासाठी पोलिस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. इतर तरुणांनीही स्वत:हून सायलेन्सर जमा करावेत. पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल, असे एपीआय अजित पाटील यांनी सांगितले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 12, 2024 7:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापूरच्या बुलेटवाल्यानं अशी सुधारली चूक, पोलिसांनीही केलं त्या निर्णयाचं कौतुक, Video