TRENDING:

Navi Mumbai Recruitment: नवी मुंबई महापालिकेत मेगाभरती, 15 जुलैपासून परीक्षा, संपूर्ण माहिती

Last Updated:

Navi Mumbai Recruitment: नवी मुंबई महापालिकेतील विविध 368 पदांसाठी सरळसेवेतून भरती प्रक्रिया होत आहे. 15 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई महापालिकेत 368 पदांची सरळसेवेतून मेगाभरती होत  आहे. यासाठी राज्यभरातून अर्ज मागण्यात आले होते. यामध्ये 84 हजारांहून अधिक उमेदवारांचे अर्ज आले असून त्यांची परीक्षा 15 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे व सुरळीत करण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले जात आहेत.
Navi Mumbai Recruitment: नवी मुंबई महापालिकेत मेगाभरती, 15 जुलैपासून परीक्षा, संपूर्ण माहिती
Navi Mumbai Recruitment: नवी मुंबई महापालिकेत मेगाभरती, 15 जुलैपासून परीक्षा, संपूर्ण माहिती
advertisement

नवी मुंबई महापालिकेतील विविध 368 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील 84 हजार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. आता 15 जलैपासून ऑनलाईन परीक्षा सुरू होत आहेत. 21 जुलैपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Thane Water Cut: ठाण्यात धो धो पाऊस, पण पाणी जपून वापरावं लागणार, या भागात पुरवठा बंद राहणार

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दरम्यान, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर आणि इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असणार आहे. सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे गट क आणि गट ड संवर्गातील विविध पदे भरली जाणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा पदभरती 2025 च्या अनुषंगाने काही विचारणा करावयाची झाल्यास सामान्य प्रशासन विभाग, 022 27567189 या हेल्पलाईन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
Navi Mumbai Recruitment: नवी मुंबई महापालिकेत मेगाभरती, 15 जुलैपासून परीक्षा, संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल