Thane Water Cut: ठाण्यात धो धो पाऊस, पण पाणी जपून वापरावं लागणार, या भागात पुरवठा बंद राहणार
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane Water Cut: ठाणेकरांना ऐन पावसाळ्यात पाणी जपून वापरावं लागेल. काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे : गेल्या काही दिवसांत मान्सूनने हजेरी लावली असून ठाण्यात जोरदार पाऊस होतोय. परंतु, पुढील काही दिवस ठाणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. ठाणे पालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
या भागात पुरवठा बंद राहणार
ठाण्यातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, पवारनगर, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी येणार नसल्याने नागरिकांना पाणी जपून वापरावं लागेल.
advertisement
कळवा आणि मुंब्र्याचा काही भाग, समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, ईटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर या परिसरात देखील पाणीपुरवठा बंद राहील. या भागात बुधवारी रात्री 9 ते गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीसाठी टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील पाण्याचा वापर जपून करावा लागेल.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
June 17, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Water Cut: ठाण्यात धो धो पाऊस, पण पाणी जपून वापरावं लागणार, या भागात पुरवठा बंद राहणार


