हर्षल हा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी नाही तर त्याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये एमएससीचं शिक्षण घेतलंय, त्यामुळे त्याच्या या यशाला वेगळं परिमाण मिळालं आहे. हर्षलच्या या यशामुळे त्याच्या करिअरमध्ये त्याच्या शिक्षणाचं मोलच सिद्ध झालेलं नाही तर तसंच शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत निर्माण झाला आहे. जबरदस्त इच्छाशक्ती, परिश्रम, चिकाटी आणि समर्पण या गुणांमुळे आपण निवडलेल्या क्षेत्रातही अद्वितीय यश मिळवता येऊ शकतं हे हर्षलच्या यशाने सिद्ध केलंय, याबाबतचं वृत्त ‘इंडिया टूडे’ नं दिलं आहे.
advertisement
इंजिनीअर नसतानाही टेक्निकल उद्योगात काम करण्याच्या संक्रमणाबाबत हर्षल म्हणाला,‘ बीसीएस करताना मला लक्षात आलं की जगात अतिशय वेगाने बदलत चाललेल्या टेक्नॉलॉजीच्या काळात सतत आपली कौशल्य अद्ययावत करून कालसुसंगत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मी क्रमिक अभ्यासाबाहेरचं माझं ज्ञान वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. पुण्यातल्या एमआयटी-डब्ल्युपीयूमध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या विषयात मास्टर्स डिग्री करताना मला मूलभूत विषयांबाबत उद्योगातील अनुभवी व्यक्तींकडून ट्रेनिंग मिळालं तसंच मोठ्या डेटासेट्सवर काम करायला, स्टॅटिस्टिकल अल्गोरिदम अनलाईज करायला, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवायला आणि प्रीडिक्टिव्ह मॉडेल्स तयार करायला मिळाली.’
एकूणात कॉम्प्युटर सायन्समधील शिक्षण, एमएससी, सेल्फ लर्निंग आणि इंडस्ट्रीतील गोष्टींसह अद्ययावत होत राहण्यामुळे हर्षल टेक इंडस्ट्रीत सहज प्रवेश करू शकला.
(दोनदा आलं अपयश पण सोडली नाही जिद्द, शेतकऱ्याची लेक झाली PSI Video)
तो म्हणाला, ‘माझ्या कष्टांना इतकं मोठं फळ मिळालंय यावर माझा विश्वासच बसत नाहीए. टेक जायंट कंपनी गुगलमध्ये संशोधन, कटिंग एज प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाल्याने मला आनंद झालाय त्याचबरोबर या क्षेत्रातील आव्हानांना कधी सामोरा जातोय अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. जगातल्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या जगतात योगदान देण्याचा प्रवास सुरू करायला मी आतुर झालोय.’
तंत्रज्ञान आणि संशोधनाची पॅशन
गुगलसारख्या कंपन्या तंत्रज्ञान आणि संशोधनाची पॅशन असलेल्या व्यक्तींना नोकरी देतात. ही नोकरी मिळवताना कोणत्या घटकांची मदत झाली हे सांगताना हर्षल म्हणाला, ‘तंत्रज्ञान आणि संशोधनासाठीच्या माझ्या पॅशनचा माझ्या निवडीत महत्त्वाचा वाटा आहे. मी गुगलमध्ये इंटर्न म्हणून काम केलं होतं त्यामुळे या कंपनीत काम करण्याचा अनुभव गाठीशी होता. इंटर्न असताना मला तिथलं वर्क कल्चर अनुभवता आलं आणि अत्यंत प्रज्ञावंतांसोबत संवादाची तसंच माझ्या कक्षा रुंदावण्याची संधी मला मिळाली. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही भविष्यातली टेक्नॉलॉजी आहे आणि या विषयातील प्रवीण व्यक्तींना मार्केटमध्ये मोठी मागणी आहे.’
गुगलचा इंटरव्ह्यू असा झाला
गुगलमधील इंटरव्ह्यू हा प्रचंड कठीण असतो. त्याबाबत तो म्हणाला,‘इंजिनीअररिंग बॅकग्राउंड नसलेल्या पदवीधरांना नक्कीच हा इंटरव्ह्यू आव्हानात्मक वाटेल पण त्यांचा दृष्टिकोन अचूक असेल तर ते त्यावर मात करतील. गुगलसारखी कंपनी टेक इंडस्ट्रीत काम करण्याची पॅशन, समर्पण, नवं शिकण्याची तयारी असणाऱ्या योग्य उमेदवारातच गुंतवणूक करते. त्यामुळेच त्यांची निवड प्रक्रिया कठीण आहे पण जर योग्य दृष्टिकोन आणि सकारात्मकता असेल तर कोणीही ही प्रक्रिया पूर्ण करून नोकरी मिळवू शकतं.’
(35 परीक्षांमध्ये नापास, पण 36 व्यावेळी पास; आता आहे IAS अधिकारी; नाव आहे विजय वर्धन)
गुगलमध्ये काम करायचंय?
गुगल किंवा टेक इंडस्ट्रीत करिअर करू इच्छिणाऱ्या इंजिनीअर नसलेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यकालीन टेक्नॉलॉजीसंबंधी दृष्टिकोन विकसित करावा असं हर्षल सांगतो. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासोबत प्रगत होणं तसंच नव्या गोष्टी शिकणं, सतत स्पर्धात्मक राहणं या गुणांमुळे या इंडस्ट्रीत यश मिळू शकतं असंही हर्षलचं मत आहे.
गुगलमध्ये हे काम करायचंय
हर्षल म्हणाला, ‘ग्राउंड-ब्रेकिंग टेक्नॉलॉजींच्या विकासात अग्रेसर राहण्याची माझी इच्छा आहे. या टेक्नॉलॉजीज इन्फर्मेशन प्रोसेसिंग, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स सोडवणं यासगळ्यात क्रांतिकारक बदल घडवून आणतील त्यांच्या विकासासाठी मला गुगलमध्ये काम करायचं आहे. जागतिक तंत्रज्ञान विकासात मला योगदान द्यायची इच्छा आहे त्यासाठी गुगलसारखा प्लॅटफॉर्म मोलाचा ठरेल.’