दोनदा आलं अपयश पण सोडली नाही जिद्द, शेतकऱ्याची लेक झाली PSI Video
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
जिद्द आणि मेहनतीच्या बळावर जयश्रीने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
छत्रपती संभाजीनगर, 4 ऑगस्ट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल काही दिवसापूर्वी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कापुस वडगाव या गावातील जयश्री निगल या शेतकऱ्याच्या मुलीनेही या परीक्षेत यश मिळवलंय. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर जयश्रीने मोठं यश संपादित केलं असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कसा झाला प्रवास?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यामधील कापुस वडगाव या गावची जयश्री जनार्धन निगल आहे. जयश्रीचे आई-वडील शेती करतात. जयश्रीचे शालेय शिक्षण हे तिच्या गावाकडेच झालं. त्यानंतर ती माध्यमिक शिक्षणासाठी वैजापूरला आली. यानंतर जयश्रीने अकरावी बारावीचे शिक्षण सायन्समध्ये घेतलं. पण तिला त्याच्यामध्ये काही गोडी नसल्यामुळे तिचे अभ्यासात मन रमत नव्हते आणि तिला बारावीला टक्के सुद्धा कमी पडले. त्यानंतर तिने पदवीनंतर ठरवले की स्पर्धा परीक्षेची तयार करायची.
advertisement
दोनदा अपयश
माझा चुलत भाऊ हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याच्याकडून मला स्पर्धा परीक्षा विषयी माहिती मिळाली. यासाठी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. सुरुवातीला क्लासेस जॉईन केले आणि नंतर काही दिवसांनी स्वतः अभ्यास करायला सुरुवात केली. 2017 साली मी जेव्हा पीएसआय पदाचा पहिला पेपर दिला तेव्हा फॉर्म भरण्यामध्ये चूक झाली होती. त्यामुळे मला पहिल्या वेळेस अपयश आले. परत 2019 ला सुद्धा पीएसआयचा पेपर दिला तेव्हा सुद्धा तिचा थोड्या मार्कवरून अपयश आले. मी पुन्हा पीएसआय पदाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि 2020 च्या परीक्षेमध्ये पीएसआय पद भेटलं. पीएसआय झाले याचा मला खूप अभिमान आहे, असं जयश्री निगलने सांगितले.
advertisement
खूप कष्टाने मिळवले यश
जयश्रीने हे यश खूप कष्टाने मिळवलेले आहे. तिने यासाठी खूप मेहनत घेतली तिला दोनदा अपयश आले तरी सुद्धा तिने न थांबता जोमान अभ्यास केला. आज ती पीएसआय झाली आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला तिचा खूप अभिमान वाटतोय, असं जयश्रीचा भाऊ निगल शैलेश यांनी सांगितले.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 04, 2023 5:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दोनदा आलं अपयश पण सोडली नाही जिद्द, शेतकऱ्याची लेक झाली PSI Video