सरकार एका झटक्यात 50 हजार जागा भरणार; कुठे, कधी? पात्रता आणि अटी जाणून घ्या
एकूण रिक्त पदे किती ?
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकूण १६५ पदांची भरती सुरू आहे. बँकेमध्ये भरतीला सुरूवात १७ ऑगस्टपासून झाली असून भरतीची शेवटची तारीख २९ ऑगस्ट आहे. 'दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे' या बँकेमध्ये ज्यु. बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील १२३, शिपाई श्रेणीची ३६, सुरक्षारक्षक ५, वाहनचालक १ असे एकूण १६५ रिक्त पदे आहेत. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोकरीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराला www.thanedistrictbank.com किंवा www.thanedccbank.com या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकता.
advertisement
वेतन किती?
ज्यु. बँकिंग असिस्टंट श्रेणीसाठी उमेदवाराला दरमहा रू.२०,०००/- एकत्रित वेतन अदा करण्यात येईल. शिपाई श्रेणीतील उमेदवाराला दरमहा रू. १५,०००/- एकत्रित वेतन अदा करण्यात येईल. वॉचमन श्रेणीतील उमेदवाराला दरमहा रू. १५,०००/- एकत्रित वेतन अदा करण्यात येईल. तर, वाहनचालक श्रेणीतील उमेदवाराला दरमहा रु. १५,०००/- एकत्रित वेतन अदा करण्यात येईल.
ना CV, ना डिग्री, कंपनी देतेय थेट 1 कोटी पगाराची नोकरी; फक्त या 2 प्रश्नांची उत्तरं द्या
अर्ज केव्हा करायचा?
दि. १८/०८/२०२५ ते दि.२९/०८/२०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत, 'दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक'मध्ये नोकरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन परिक्षा तारीख, ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची तारीख आणि कागदपत्रे पडताळणी व मुलाखतची तारीखही बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करता येईल.
महत्वाचे तारखा आणि कागदपत्रे
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना स्वत:चा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचुक भरणे आवश्यक आहे. उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज भरता येणार आहे. अपलोड केलेल्या अर्जात पुन्हा दुरूस्ती करता येणार नाही, याची नोंद घ्यावी. अर्ज भरतांना ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करीत आहात, त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता तुमच्याकडे आहे का ? याची खात्री करुनच अर्ज भरावा. अपात्र अर्जाबाबत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.