One Crore Salary Job: ना CV, ना डिग्री, कंपनी देतेय थेट 1 कोटी पगाराची नोकरी; फक्त या 2 प्रश्नांची उत्तरं द्या
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
One Crore Salary Job: बेंगळुरुच्या स्टार्टअपने भरतीची पारंपरिक साखळी तोडत एक कोटींची नोकरी फक्त 100 शब्दांत देण्याचं जाहीर केलं आहे. डिग्री, रिज्युमे किंवा लांबट इंटरव्ह्यूला येथे स्थानच नाही – फक्त स्किल महत्त्वाचं!
मुंबई: बेंगळुरूमधील एका स्टार्टअप कंपनी त्यांच्या अनोख्या हायरिंग एक्सपेरिमेंटद्वारे चर्चेत आली आहे. एका वर्षासाठी 1 कोटी रुपयांची टेक नोकरी, तीही CV, कॉलेज डिग्री किंवा लांबट इंटरव्ह्यू राउंडशिवाय! ही पोस्ट Smallest AI या कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामथ यांनी X वर शेअर केली आहे. ही एक फुल-स्टॅक टेक लीड पदासाठीची ऑफर आहे आणि ही इतर सर्व नोकरीच्या जाहिरातींपेक्षा वेगळी ठरते.
यासाठी 60 लाख रुपयांची फिक्स सैलरी आणि 40 लाख रुपयांची कंपनी इक्विटी मिळणार आहे. ही एक पूर्णवेळ, पाच दिवसांची ऑफिस-आधारित नोकरी आहे. पण फ्लेक्सिबल तासांसह आणि पारंपरिक पात्रता व इंटरव्ह्यू प्रक्रियांच्या ऐवजी, फक्त दोन गोष्टी विचारल्या आहेत:
100 शब्दांत स्वतःचं परिचय
तुमच्या सर्वोत्तम कामाचा लिंक
कॉलेज – महत्त्वाचं नाही. CV – गरज नाही, असं सुदर्शन कामथ यांनी त्यांच्या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
डिग्रीपेक्षा स्किल्स महत्त्वाच्या!
या पोस्टनुसार, योग्य उमेदवाराकडे –
– 4 ते 5 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असावा
– Next.js, Python आणि React.js यांचा मजबूत अभ्यास असावा
– सिस्टम शून्यावरून 100 पर्यंत स्केल करण्याचा अनुभव असावा
कामथ यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ही मॅनेजरियल पोझिशन नाही. तुम्ही एक ‘हँड्स ऑन’ डेव्हलपर असायला हवा.

advertisement
सोशल मीडियावर प्रचंड चर्चा
या पोस्टला आतापर्यंत ६० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ती इंटरनेटवर तुफान गाजतेय. एका युजरने X वर लिहिलं, जर तुम्ही अनुभवाची मागणी करताय. तर तुम्ही क्रॅक केलेल्या लोकांना हायर करत नाही. Cursor तर कमी अनुभवी लोकांनी तयार केलंय. त्यांनी 4 ते 5 वर्षांच्या अनुभवाच्या अटीवर प्रश्न उपस्थित केला.
advertisement
कामथ यांनी उत्तर दिलं: तुम्ही बरोबर आहात. ही फक्त एक सामान्य मार्गदर्शक अट आहे. बहुतेक क्रॅक केलेले लोक अनुभवाच्या पलिकडचे असतात.
एका दुसऱ्या युजरने लिहिलं: ही ऑफर खूपच रोचक आहे. केवळ कामावर लक्ष केंद्रित. निव्वळ कौशल्य आणि अनुभव!
तर एक युजर म्हणाला, संपूर्ण ऑफिस बेस्ड न करता हायब्रिड असतं तर अधिक छान झालं असतं. अनेकांनी अंदाज व्यक्त केला की या हटके हायरिंग अटींमुळे ही पोस्ट लवकरच व्हायरल होणार.
advertisement
भविष्यात अशीच भरती?
विश्व युवा कौशल्य दिन (15 जुलै) च्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया दाखवते की भारतीय स्टार्टअप्स आता डिग्रीपेक्षा प्रत्यक्ष कौशल्यावर भर देत आहेत. हे परिवर्तन विशेषतः त्या तरुण टेक प्रोफेशनल्ससाठी आशादायक आहे, जे पारंपरिक शैक्षणिक चौकटीबाहेर स्वतःचं पोर्टफोलिओ तयार करत आहेत.
हे कंपनीचं पहिलं धाडसी पाऊल नाही. या वर्षाच्या सुरुवातीला Smallest AI ने 40 लाख रुपये वार्षिक पगाराची आणखी एक नोकरीची ऑफर दिली होती – तीही CV शिवाय, फक्त जूनियर डेव्हलपर्ससाठी.
advertisement
यातून हे स्पष्ट होतं की स्टार्टअप्समध्ये आता कौशल्याला कागदापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं आणि भरती प्रक्रियाही अधिक सुलभ केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2025 11:13 PM IST
मराठी बातम्या/मनी/
One Crore Salary Job: ना CV, ना डिग्री, कंपनी देतेय थेट 1 कोटी पगाराची नोकरी; फक्त या 2 प्रश्नांची उत्तरं द्या