वैशाली, 26 सप्टेंबर : असं म्हणतात की, योग्य मित्र जर आयुष्यात असला, तर आयुष्य नक्कीच बदलतं. एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं आहे. मित्राच्या सल्ल्याने एका बेरोजगार तरुणाने व्यवसाय सुरू केला आणि यानंतर या व्यक्तीचं आयुष्यच बदललं आहे. आज हा व्यक्ती दर महिन्याला 50 ते 60 रुपये नफा कमावत आहे.
पंकज असे या व्यक्तीचे नाव आहे. पंकज हे बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंजच्या मानिकपूर पकडी गावातील रहिवासी आहेत. मित्राच्या सल्ल्यावर पंकजने पंतप्रधान रोजगार हमी कार्यक्रमांतर्गत कर्ज घेऊन पिठाची गिरणी सुरू केली. यामाध्यमातून ते आता घरी बसून दरमहा 50 ते 60 हजार रुपये कमवत आहेत. तसेच या माध्यमातून ते आता अनेकांना रोजगारही देत आहेत.
advertisement
मित्राने दिला होता सल्ला -
पंकज हे बेरोजगारीने त्रस्त होते. 2019 मध्ये त्यांनी भेट एका मित्राशी झाली. हा मित्र त्यावेळी पिठाची गिरणी चालवून चांगली कमाई करत होता. त्यामुळे त्याने पंकज यांना बेरोजगारी दूर करण्यासाठी पिठाची गिरणी सुरू करावी, असा सल्ला दिला होता. हा सल्ला पंकज यांना आवडला. मग त्यांनी पंतप्रधान रोजगार हमी कार्यक्रमांतर्गत फ्लॉवर मिलसाठी अर्ज केला. त्यांचा अर्ज मंजूर झाला. यानंतर त्यांना बँकेकडून कर्ज मिळाले.
प्रत्येक महिन्याला इतकी कमाई -
कर्जाच्या पैशातून पंकजने आपल्या गावात पिठाची गिरणी सुरू केली. आज पंकज हे दोन ते तीन टन पीठाचा बाजारात पुरवठा करतात. सर्व खर्च वगैरे काढून ते आज महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमावत आहे. इतकेच नाही तर अनेकांना त्यांनी आपल्या पिठाच्या गिरणीत रोजगारही दिला आहे.
पंकज म्हणाले की, ते 25 रुपये प्रति किलोने बाजारात पीठाचा पुरवठा करतात. त्यांच्याकडे असलेल्या मशीनमध्ये दररोज पाच टन मैदा तयार करण्याची क्षमता आहे. पण सध्या भांडवल थोडे कमी आहे. त्यामुळे ते दररोज फक्त दोन ते तीन टन गव्हाचे पीठ तयार करतात. जर भांडवलाची व्यवस्था केली असेल तर ते यातून अधिक पैसे कमावू शकतात.
तरुणांना दिला हा महत्त्वाचा संदेश -
जे रोजगाराच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहेत, अशा तरुणांना संदेश देताना पंकज यांनी म्हटलं की, जर तुम्हीही चांगल्या कमाईसोबतच लोकांना रोजगार देऊ इच्छित असाल तर स्वत:चा व्यवसाय सुरू करा. केंद्र सरकारसह राज्य सरकारही व्यवसायासाठी आर्थिक मदत करते असे ते म्हणाले.