मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आयएएस अधिकाऱ्यांचा पगार एकाच स्तरावरून सुरू होतो. नंतर कार्यकाळात आणि पदोन्नतीनुसार हा पगार वाढत जातो. सातव्या वेतन आयोगानुसार, नवोदित आयएएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये मूळ वेतन दिलं जातं. याशिवाय त्यांना टीए, डीए आणि एचआरए यांसारखे भत्ते मिळतात. एका आयएएस अधिकाऱ्याला सुरुवातीला सर्व भत्त्यांसह दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळतो. कॅबिनेट सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचा पगार दोन लाख 50 हजार रुपयांपर्यंत जातो.
advertisement
प्रमोशन मिळाल्यानंतर आयएएस अधिकारी कॅबिनेट सचिव देखील बनू शकतो. या पदासाठी दोन लाख 50 हजार रुपये मूळ वेतन आहे. महागाई भत्ता, वैद्यकीय भत्ता, प्रवास भत्ता आणि घरभाडे भत्ता यासह पाच लाख 60 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. कॅबिनेट सचिव डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी पात्र असतात.
आयएएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या इतर सुविधा
आयएएस अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे पे बँड निर्धारित केले आहेत. यामध्ये ज्युनिअर स्केल, सीनिअर स्केल, सुपर टाइम स्केल यांचा समावेश आहे. मूळ वेतन आणि ग्रेड पे व्यतिरिक्त, त्यांना महागाई भत्ता (डीए), घरभाडे भत्ता (एचआरए), वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता देखील मिळतो. पे बँडच्या आधारे त्यांना घर, स्वयंपाकी आणि इतर कर्मचारी अशा अनेक सुविधा दिल्या जातात. जर एखाद्या आयएएस अधिकाऱ्याला पोस्टिंगच्या काळात कुठे जावं लागलं तर त्याला सरकारी घरही मिळते. कुठेही जाण्यासाठी त्यांना चालकासह वाहनही मिळते.
आयएएस अधिकाऱ्यांना मिळणारे भत्ते:
महागाई भत्ता (डीए): सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा हा समायोजन भत्ता असतो. हा मूळ पगाराचा एक भाग असतो आणि तो वेळोवेळी समायोजित केला जातो. मूळ वेतनाच्या अंदाजे 17 टक्के रक्कम डीए म्हणून मिळते.
घरभाडे भत्ता (एचआरए): ज्या अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध नसते अशांना घरभाडे भत्ता दिला जातो. हा भत्ता पोस्टिंगच्या शहरावर अवलंबून असतो आणि मूळ वेतनाच्या आठ ते 24 टक्के असू शकतो.
प्रवास भत्ता (टीए): आयएएस अधिकाऱ्यांना अधिकृत कामासाठी प्रवास करावा लागला तर या प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी प्रवास भत्ता मिळतो. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचा समावेश आहे.