सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी पुढील काही महिने दिलासादायक असणार आहेत. अनेक केंद्रीय विभागांमध्ये तसेच राज्य स्तरावर रिक्त पदांची घोषणा होणार आहे. तुम्हाला ज्या विभागामध्ये काम करायचे आहे त्या विभागाच्या ऑफिशिअल वेबसाईटवर तुम्ही सरकारी भरतीचे नोटिफिकेशन पाहू शकता. एप्रिल 2024 मध्ये सरकारी नोकऱ्यांचे ऑप्शन कुठे उपलब्ध असतील, ती यादी पाहा.
एसएससी सीएचएसएल भरती नोटिफिकेशन
advertisement
स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC CHSL 2024) दरवर्षी संयुक्त हायर सेकंडरी लेव्हल परीक्षा आयोजित करते. एसएससी सीएचएसएल परीक्षा उत्तीर्ण करून, 12 वी पास तरुण भारत सरकारच्या गट ‘सी’ आणि गट ‘बी’मध्ये (अराजपत्रित) नोकरी मिळवू शकतात. एसएससी परीक्षा कॅलेंडर 2024 नुसार, एसएससी सीएचएसएल 2024 नोटिफिकेशन एप्रिलमध्ये ssc.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल. एसएससी सीएचएसएल 2024 परीक्षा जून-जुलै 2024 मध्ये होईल.
एसएससी जेई भरती 2024
एसएससी ज्युनिअर इंजिनीअर भरती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध सरकारी विभागांमध्ये ज्युनिअर इंजिनीअर पदांसाठी एसएससी जेई परीक्षेद्वारे भरती केली जाईल. SSC Junior Engineer Vacancy 2024 (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू आहे. यासाठी फॉर्म 18 एप्रिल पर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत भरता येईल. तर, 19 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाइन फी भरता येणार आहे.
बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी भरती
बँक ऑफ इंडियाने (बीओआय) विविध पदांसाठी भरती नोटिफिकेशन जारी केले आहे. सरकारी बँकांमधील नोकरीसाठी तुम्ही एकूण 143 रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. बँक ऑफ इंडिया व्हेकन्सी 2024 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज सादर करू शकतात. बँक ऑफ इंडियाने परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. लेखी परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
यूपी मेट्रो भरती 2024
UP मेट्रो भरती नोटिफिकेशन आणि परीक्षेची संभाव्य तारीख जाहीर झाली आहे. उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन (UPMRC) स्टेशन कंट्रोलर-कम-ट्रेन ऑपरेटर, ज्युनिअर इंजिनीअरसह विविध कार्यकारी आणि गैर-कार्यकारी पदांसाठी भरती परीक्षा आयोजित केली जाईल. तुम्ही यूपी मेट्रोमध्ये सरकारी भरती 2024 साठी 19 एप्रिलपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरू शकता. यूपी मेट्रोमधील सरकारी नोकरी भरती परीक्षेच्या संभाव्य तारखा 11, 12 आणि 14 मे 2024 आहेत.