नोएडा, 26 सप्टेंबर : जेव्हा तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करतात, तेव्हा समस्या तर या येणारच. मात्र, जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, तर एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळू शकते, हे एका महिलेने सिद्ध केले आहे. लॉकडाऊन दरम्यान, अनेकांचे रोजगार गेले. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. मात्र, या महिलेने या कालावधीला एक संधी म्हणून पाहिले. त्यांनी या काळात घरीच केक बनवण्याची सुरूवात केली. यानंतर आज त्या यशस्वी उद्योजिका झाल्या आहेत.
advertisement
वंदना जोशी असे या महिलेचे नाव आहे. त्या नोएडाच्या सेक्टर 15 ए मध्ये राहतात. त्यांनी लॉकडाउनमध्ये घरीच केक तयार करायला सुरुवात केली. यानंतर आज 3 वर्षांत त्यांच्या केकला आणि कुकीजला देशभरात मागणी होत आहे. त्या आजही आपल्या घरुनच काम करतात. तसेच दिल्ली आणि एनसीआरसह देशातील विविध भागात आपली उत्पादने पोहोचवतात.
वंदना जोशी यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या आधी त्या मुलांना विविध विषयाचे शिक्षण द्यायच्या. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वच जण आपल्या घरात होते. तेव्हा त्यांना वाटले, असं काहीतरी करावं, ज्यामुळे घरंही चालू शकेल आणि लोकांच्या गरजाही पूर्ण होतील. यानंतर मग त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे केक आणि कुकीज बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. आज 3 वर्षांनंतर त्यांचे काम इतके वाढले आहे की, त्या फक्त दिल्ली आणि एनसीआरच नाही तर देशातील इतर भागांमध्येही केक आणि कुकीज पोहोचवत आहेत.
चवीबाबत घेतात काळजी -
वंदना जोशी सांगतात की, त्या वेगवेगळ्या प्रकारचे केक आणि कुकीज बनवतात. सामान्यत: असा विचार असत की, केक आणि कुकीज आरोग्यासाठी इतके चांगले नसते. मात्र, त्या आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार, जे आरोग्याला खूप चांगले असेल, अशा प्रकारचा केक बनवतात.
त्यांनी बनवलेल्या केकमध्ये साखरेऐवजी गुड वापरला जातो. तसेच मैदाऐवजी गव्हाचा वापर केला जातो, ज्यामुळे लोकांना आरोग्यादायी उत्पादने मिळावीत. सोबतच त्या ज्या विविध प्रकारच्या कुकीज बनवतात, त्यासुद्धा लोकांना पसंत पडत आहेत.
देशाच्या विविध भागातून मागणी -
वंदना जोशी यांनी पुढे बोलताना सांगितले की, त्या आपले सर्व काम आजही घरुनच करतात. सुरुवातीला त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याच परिसरात लोकांचे ऑर्डर घेणे सुरू केले. आता हळहूळ एनसीआर सह देशातील विविध शहरांमध्ये त्यांना ऑर्डर मिळत आहे. यासोबतच त्यांना कॉर्पोरेट कंपन्यांचेही ऑर्डर्स मिळतात. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांनी आपले अकाऊंट तयार केले आहे. या माध्यमातूनही त्यांच्या केक आणि कुकीजला चांगली मागणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.