TRENDING:

साताऱ्यातील पोरांचा थायलंडमध्ये कांड, जर्मन तरुणीवर सामूहिक अत्याचार, बीचवर फिरायला गेले अन्...

Last Updated:

Satara Crime News: साताऱ्यातील दोन तरुणांनी थांयलंडला फिरायला जात एका जर्मन तरुणीवर सामूहिक अत्याचार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा: सातारा जिल्ह्याची मान शरमेनं खाली झुकवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साताऱ्यातील दोन तरुणांनी थांयलंडला फिरायला जात एका जर्मन तरुणीवर सामूहिक अत्याचार केला आहे. हे दोन्ही तरुण काही दिवसांपूर्वी थायलंड फिरायला गेले होते. येथील एका बीचवर फिरत असताना त्यांना जर्मन तरुणी दिसली. एकट्या तरुणीला पाहून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला आहे.
News18
News18
advertisement

अत्याचाराची ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर थायलंड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत दोन्ही नराधमांना अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध घेत मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोनजण अलीकडेच थायलंड फिरण्यासाठी गेले होते. थायलंडला गेल्यानंतर येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

अत्याचाराच्या घटनेनंतर संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तातडीने तपासाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. साताऱ्यातील दोन जणांनी थायलंडला जाऊन २४ वर्षीय जर्मन तरुणीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
साताऱ्यातील पोरांचा थायलंडमध्ये कांड, जर्मन तरुणीवर सामूहिक अत्याचार, बीचवर फिरायला गेले अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल