याबाबत अब्दुलचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितलं, की ‘माझं मुलाशी शेवटचं बोलणं 7 मार्चला झालं होतं. त्यानंतर तो आमच्या कुटुंबातल्या कोणाच्याही संपर्कात नाही. त्याचा मोबाइल फोनही बंद आहे. अब्दुलच्या अमेरिकेतल्या रूममेट्सशी मी संपर्क साधला होता. त्या वेळी कळलं, की अब्दुल हरवल्याची तक्रार क्लीव्हलँड पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. त्यातच 19 मार्च 2024 ला आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने दावा केला, की ड्रग्ज विकणाऱ्या टोळीनं अब्दुलचं अपहरण केलं असून त्याच्या सुटकेसाठी 1200 अमेरिकन डॉलर्स द्या.’
advertisement
‘खंडणी न दिल्यास अब्दुलची किडनी विकण्याची धमकीही फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली,’ असं सांगतानाच अब्दुलचे वडील सलीम पुढे म्हणाले, ‘मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितलं, की अब्दुलचं अपहरण करण्यात आलं असून, त्याच्या सुटकेसाठी पैसे द्या. परंतु पैसे कसे पाठवायचे, याबाबत त्या व्यक्तीनं काहीही माहिती दिली नाही. जेव्हा त्या व्यक्तीला मी माझ्या मुलाशी बोलणं करून द्या, असं सांगितलं, तेव्हा संबंधित व्यक्तीने त्यास नकार देऊन फोन ठेवून दिला.’
आता अब्दुलच्या पालकांनी त्यांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी आणि त्याला सुखरूप भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारला आवश्यक पावलं उचलण्याची विनंती केली आहे. या संदर्भात सलीम यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना पत्रही लिहिलं आहे.