नेमकं काय घडलं?
23 वर्षीय तरुणी आणि आरोपी 27 वर्षीय पती पुण्यातील पौड रस्त्यावरील भागात राहतात. वर्षभरापूर्वी यांचे लग्न झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. बुधवारी (31 डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास तक्रारदार तरुणी झोपली असताना, पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून पतीने तिच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकला. या घटनेत तरुणीच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे.
advertisement
बाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात! दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, Video
यामुळे 23 वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली आहे. आरोपी 27 वर्षीय पती खासगी ठिकाणी नोकरी करतो. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार एम. जी. दळवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेला बेदम मारहाण करून तिच्या चेहऱ्यावर ॲसिडसदृश द्रवपदार्थ ओतण्यात आला. ही घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली असून, उत्तमनगर पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
