बुधवारी संध्याकाळी उशिरा आशा देवी आपल्या दोन मुलांसह घरातून बाहेर पडल्याचं सांगण्यात येत आहे. आशा देवी पळून गेल्याची गावात चर्चा होती. पती संजय चौहानने रात्रभर शेतात आणि इतर ठिकाणी तिचा शोध घेतला; मात्र ती किंवा मुलं सापडली नाहीत. गुरुवारी सकाळी तलावामध्ये तिघांचे मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर गावातल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
ग्रामस्थांनी सांगितलं, की आशादेवी बुधवारी पती आणि मुलांसह खरेदीसाठी बाजारात गेली होती. घरातले सर्व सदस्य आनंदाने घरी येत असल्याचं अनेकांनी बघितलं होतं. ही महिला आपल्या मुलांसह आत्महत्या करील, अशी शंकादेखील कुणाच्या मनात नव्हती. बुधवारी तिची वर्तणूकदेखील सर्वसाधारण होती. त्यामुळे या घटनेने शेजारीपाजारी आश्चर्यचकित झाले आहेत.
पोलीस स्टेशनचे प्रमुख कलामुद्दीन यांनी सांगितलं, की या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. अर्जानुसार एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल.
'प्रभात खबर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सासाराम इथल्या रुग्णालयात पाठवले आहेत. मृत महिलेच्या आई-वडिलांनी पती संजयवर पत्नी आणि मुलांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
