फसवणुकीची नवी पद्धत
पूर्वी ‘पोलीस आहोत’ असे सांगून किंवा ‘पुढे खून झाला आहे’ असे भासवून महिलांना लुटले जात होते. मात्र, महिला आता सतर्क झाल्याने चोरट्यांनी बोलण्याचा हा नवा फंडा सुरू केला आहे. साधी राहणीमान असल्यामुळे लवकर विश्वास बसेल या हेतूने चोरटे लेंगा, टोपी आणि साधा शर्ट घालून गर्दीच्या ठिकाणी फिरत आहेत.
advertisement
अशी करतात फसवणूक
- चोरटे एका महिलेला एकटी पाहून तिला चोहोबाजूंनी घेरतात.
- त्यातील एक जण मुद्दाम रस्त्यावर रुमाल टाकतो, तर दुसरा ‘तुमचा रुमाल खाली पडला आहे’ असे सांगतो.
- तिसरा तो रुमाल उचलून त्यात सोन्याच्या लहान विटा असल्याचे दाखवतो.
- ‘या सोन्याच्या विटा आपण काहीजणांनी मिळून पाहिले आहेत, त्यातील एक वीट तुम्हाला देतो आणि बाकीच्या आम्ही घेतो’ असे सांगून महिलेला अंगावरील दागिने काढायला सांगतात.
- नंतर, रुमालात सोन्याची वीट असल्याचा भास निर्माण करून तो रुमाल महिलेच्या हातात दिला जातो, पण काही वेळाने उघडल्यावर आत दगड असतो.
पोलिसांची कारवाई सुरू
साताऱ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची टोळी सक्रिय झाली आहे. पोलीस या टोळीचा शोध घेत असून, फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची पथके गस्त घालणार आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर म्हणाले, “महिलांना फसवणारे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचा वेश काहीही असला तरी ते पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाहीत, लवकरच त्यांना अटक केली जाईल.”
महिलांनी काय करावे?
पोलिसांनी महिलांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींनी रस्त्यात बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. अशा व्यक्तींवर संशय आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.
हे ही वाचा : Nagpur Water: नागपूरकर पाणी जपून वापरा, 2 दिवस पुरवठा बंद राहणार, कारण काय?
हे ही वाचा : महाराष्ट्राची शान परतली! शिवकालीन 'वाघनखं' कोल्हापूरकरांच्या भेटीला; कुठे पाहता येणार?