महाराष्ट्राची शान परतली! शिवकालीन 'वाघनखं' कोल्हापूरकरांच्या भेटीला; कुठे पाहता येणार? 

Last Updated:

Kolhapur News : ऐतिहासिक शिवकालीन वाघनखे 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. लंडनहून महाराष्ट्रात परत आणलेली ही वाघनखे...

Kolhapur News
Kolhapur News
Kolhapur News : ऐतिहासिक शिवकालीन वाघनखे 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. लंडनहून महाराष्ट्रात परत आणलेली ही वाघनखे 3 मे 2026 पर्यंत शाहू जन्मस्थळ येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न सुरू असून, दसरा सोहळ्यानंतर त्यांच्या सोयीनुसार वेळ घेतली जाणार आहे.
लंडनहून परतली वाघनखे
महाराष्ट्र शासनाच्या विशेष प्रयत्नातून लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखे 3 वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. ही दुर्मिळ वाघनखे नागरिकांना पाहता यावीत यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे प्रदर्शन भरवले जात आहे. सध्या ही वाघनखे साताऱ्यात असून, आता ती कोल्हापुरात येणार आहेत. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने या प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.
advertisement
शाही दसरा सोहळ्यानंतर उद्घाटनाची शक्यता
कोल्हापुरात येणारी ही वाघनखे खूप महत्त्वाची असल्याने, मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा मानस आहे. त्यासाठी शाही दसरा सोहळ्यानंतर त्यांची वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्राची शान परतली! शिवकालीन 'वाघनखं' कोल्हापूरकरांच्या भेटीला; कुठे पाहता येणार? 
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement