जमाव बघत राहिला, पण मदतीला आला नाही
हल्लेखोर चंदू मुगदल आणि अजय मुगदल अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री 9 वाजता नीलेश आणि मुगदल यांच्यामध्ये एका किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की हल्लेखोरांनी नीलेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकाने चाकू काढून त्याच्या पोटावर अनेक वार केले. पोट फाटल्याने नीलेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला.
advertisement
पोलिसांनी वेळीच घेतली धाव अन् वाचला प्राण
हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. घटनेच्या ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी जमली होती, पण मदतीला कोणीही पुढे आले नाही. नीलेश त्याच अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. याच वेळी घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले आणि निर्मला राख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
आरोपींना केली अटक
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता एका कपड्याने नीलेशचे पोट बांधले आणि त्याला रिक्षातून तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने नीलेशचे प्राण वाचले. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपी चंदू आणि अजय या दोघांना अटक केली. आरोपी अजय मुगदल याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा : हाण की बडीव! 2 तृतीयपंथींच्या गटात तुफान हाणामारी; पोलिसांच्याही अंगावर गेले धावून आणि मग...
हे ही वाचा : Crime: दारूवरून पेटला वाद, रेल्वेरुळावर आपटलं डोकं, एका मिनिटांत 'त्या' भंगारवाल्याचा खेळ खल्लास!
