हाण की बडीव! 2 तृतीयपंथींच्या गटात तुफान हाणामारी; पोलिसांच्याही अंगावर गेले धावून आणि मग...

Last Updated:

कोल्हापुरातील ओढ्यावरील यल्लमा मंदिराच्या ताब्यावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. सोमवारी मिरवणुकीत 'जग उलटण्यावरून'...

Crime News
Crime News
कोल्हापूर : ओढ्यावरील यल्लमा मंदिराचा ताबा घेण्यावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये सोमवारी रात्री उशिरा जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही काही तृतीयपंथीयांनी धावून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर राजारामपुरी पोलिसांनी वेळीच कठोर भूमिका घेऊन दोन्ही गटांना पिटाळून लावले.
मिरवणुकीत उलटवला यल्लामाचा जग
सोमवारी दुपारी धार्मिक विधीच्या निमित्ताने तृतीयपंथीयांनी मानाच्या जागांची मिरवणूक काढली होती. पंचगंगा नदीच्या काठावरून निघालेल्या या मिरवणुकीत पुढे जाण्यावरून आणि 'जग उलटल्यावरून' त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी हा वाद मिटवून मिरवणूक मागे घेतली होती. पण वादाची ठिणगी तिथेच विझली नाही. संध्याकाळी ओढ्यावरील यल्लमा मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा एकदा दोन्ही गट मंदिराचा ताबा घेण्यावरून भिडले. हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.
advertisement
पोलिसांवरही धावून गेले तृतीयपंथी
या प्रकाराची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही आक्रमक तृतीयपंथीयांनी पोलिसांवरच धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटांना तिथून हाकलून लावले.
पोलिसांनी बळाचा वापर करताच एका गटातील तृतीयपंथीय निघून गेले. पण दुसऱ्या गटातील लोक यल्लमा मंदिराच्या आसपासच्या घरांमध्ये थांबले होते. रात्री उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. रात्री उशिरा शीघ्र कृती दलाची (Rapid Action Force) एक तुकडीही मदतीला बोलावण्यात आली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कोरोना/
हाण की बडीव! 2 तृतीयपंथींच्या गटात तुफान हाणामारी; पोलिसांच्याही अंगावर गेले धावून आणि मग...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement