Crime: दारूवरून पेटला वाद, रेल्वेरुळावर आपटलं डोकं, एका मिनिटांत 'त्या' भंगारवाल्याचा खेळ खल्लास!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मिरज रेल्वे स्थानकात भंगार गोळा करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये दारूच्या नशेत जोरदार भांडण झाले. या वादातून एकाने दुसऱ्याला जोरदार ढकलून दिले. त्यामुळे सतीश मोहिते...
सांगली : मिरज रेल्वे स्थानकात एका धक्कादायक घटनेत, भंगार गोळा करणाऱ्या दोघांच्या भांडणातून एकाचा मृत्यू झाला आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याला ढकलून दिले, आणि प्लॅटफॉर्मवर डोके आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सतीश मोहिते (वय-32, रा. कोल्हापूर) असे मृताचे नाव असून, ही घटना रात्री नऊ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
डोकं प्लॅटफाॅर्मवर आदळलं अन्
मयत सतीश मोहिते रेल्वे स्थानकावर भंगार गोळा करण्याचे काम करून तिथेच राहत होता. सोमवारी रात्री तो दुसऱ्या एका भंगार गोळा करणाऱ्यासोबत दारू पीत होता. याच वेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दुसऱ्याने सतीशला जोरात ढकलून दिले. सतीश खाली पडला आणि त्याचे डोके थेट प्लॅटफॉर्मवर आपटले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
रेल्वे प्लॅटफाॅर्मवर बेघर लोकांचा जास्त वावर
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आणि सतीशला ढकलून देणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी सतीशचा मृतदेह मिरज सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर डोक्याला झालेल्या मारामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मिरज रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन सध्या वापरात नसल्यामुळे तिथे व्यसनी, भिकारी आणि बेघर लोकांचा वावर जास्त असतो. तिथेच राहणाऱ्या या मंडळींमध्ये झालेल्या भांडणातून हा खुनाचा प्रकार घडला आहे.
advertisement
हे ही वाचा : Crime : रक्षाबंधनालाच बहिणीची मुंडन करून हत्या, प्रियकराचाही मर्डर, राक्षसी भावाचं हादरवणारं कृत्य
हे ही वाचा : फोनवर बोलली, मग दरवाजा बंद केला... गायत्रीने उचललं टोकाचं पाऊल, गर्ल्स हाॅस्टेलमध्ये पसरली भयाण शांतता!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 7:12 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime: दारूवरून पेटला वाद, रेल्वेरुळावर आपटलं डोकं, एका मिनिटांत 'त्या' भंगारवाल्याचा खेळ खल्लास!