Crime : रक्षाबंधनालाच बहिणीची मुंडन करून हत्या, प्रियकराचाही मर्डर, राक्षसी भावाचं हादरवणारं कृत्य

Last Updated:

9 ऑगस्टला देशभरात रक्षाबंधन साजरं केलं जात असतानाच भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

News18
News18
Crime : 9 ऑगस्टला देशभरात रक्षाबंधन साजरं केलं जात असतानाच भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. 19 वर्षांच्या अरविंद कुमार याने आपल्या बहिणीचे मुंडन केलं आणि तिची गळा दाबून हत्या केली. बहिणीची हत्या केल्यानंतर अरविंदने तिचा मृतदेह दगड फोडण्याच्या खडकाळ टेकडीवर फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे अरविंदने एक दिवस आधीच बहिणीचा 18 वर्षांचा प्रियकर विशाल अहिरवार याचीही हत्या केली आणि त्याचा मृतदेह 40 किमी लांब नदीच्या काठावर फेकून दिला.

दोन दिवसांच्या अंतराने मृतदेह सापडले

7 ऑगस्ट रोजी अरविंद आणि प्रकाश प्रजापती नावाचा त्याचा एक सहकारी टाहुआराली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पथराई गावात विशालच्या घरी पोहोचले तेव्हा हा प्रकार सुरू झाला. विशालच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्या लोकांनी दिल्लीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने विशालला त्यांच्यासोबत जाण्यास भाग पाडले.
त्या संध्याकाळी, विशालने त्याच्या वडिलांना फोनवर सांगितले की तो ताहुआराली येथे आहे आणि कदाचित रात्री तिथेच थांबेल. यानंतर 8 ऑगस्ट रोजी, लाहचुरा पोलिसांनी नदीजवळील झुडुपातून एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या मानेवर जखमांच्या खुणा होत्या, ज्यामुळे गळा दाबून हत्या झाल्याचे संकेत मिळत होते. मृतदेहाचा फोटो नंतर सोशल मीडियावर आला आणि विशालच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचला, त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी विशालची ओळख पटली.
advertisement
यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रपुरा गावातल्या स्थानिकांना जवळच्या टेकडीवर मुंडन केलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला. हत्या झालेली तरुणी पुच्चू अहिरवार असल्याचं तपासात समोर आलं. पुच्चू अहिरवार ही अरविंदची धाकटी बहीण होती.

लव्ह स्टोरीचा भयावह अंत

पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की विशाल आणि पुच्चू एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रेमसंबंधात होते. दोघे पहिल्यांदा नुनार गावातील एका नातेवाईकाच्या घरी भेटले. त्यांच्या मैत्रीचं लवकरच प्रेमात रूपांतर झाली, पण दोघेही वेगळ्या जातीचे असल्यामुळे कुटुंबाकडून तीव्र विरोध सुरू झाला.
advertisement
कुटुंबाचा विरोध झुगारून जानेवारीमध्ये जोडपे पळून गेले, त्यानंतर कुटुंबाने दोघंही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही तीन दिवसांत त्यांना शोधून काढले आणि परत आणले. पोलीस स्टेशनमध्ये तडजोड करण्यात आली आणि जोडपे वेगळे झाले. यानंतर पुच्चूपासून दूर जाण्यासाठी विशालचे कुटुंब हरियाणाला गेले.
पण दोघांनी फोनद्वारे संवाद साधणे सुरू ठेवले आणि पालकांच्या नकारानंतरही त्यांचे नाते टिकून राहिले. हत्येच्या दोन आठवड्यांपूर्वी, विशालचे कुटुंब रक्षाबंधनासाठी गावी परतले, यामुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला.
advertisement
अरविंद आणि प्रकाश यांनी विशालच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप विशालच्या वडिलांनी केला आहे. तर दुसरीकडे पुच्चूचे वडील पप्पू अहिरवार यांनी आपल्या मुलानेच या हत्या केल्याची कबुली दिली आहे. 'माझी मुलगी पुन्हा तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा विचार करत होती, त्यामुळे माझा मुलगा संतापला आणि त्याने तिचे मुंडन केले, तिचा गळा दाबला आणि तिचा मृतदेह टेकडीवर फेकून दिला', असं अरविंदच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं.
advertisement

हत्येनंतर अरविंद फरार

झाशीचे एसएसपी बीबीजीटीएस मूर्ती यांनी पुष्टी केली की दोन्ही खून एकमेकांशी जोडलेले प्रकरण म्हणून तपासले जात आहेत. 'प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, मुलीच्या भावाने हा गुन्हा केला आहे. आम्ही तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे, ज्यामध्ये विशालला घेऊन जाणारा तरुण देखील आहे. भाऊ सध्या फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी तीन पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत," असे एसएसपी म्हणाले.
advertisement
एसपी (ग्रामीण) डॉ. अरविंद कुमार यांनी पुढे सांगितले की 'फॉरेन्सिक पथकांनी दोन्ही गुन्ह्यांच्या ठिकाणाहून पुरावे गोळा केले आहेत. शवविच्छेदन तपासणीमुळे मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यास मदत होईल. त्यांच्या नात्याला विरोध असल्याने आम्ही ऑनर किलिंगसह सर्व बाजूंनी तपास करत आहोत'.
दरम्यान पुरावे आणखी भक्कम करण्यासाठी पोलीस आसपासच्या परिसरातील कॉल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसंच या कटात आणखी लोक सामील होते का? याचाही तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime : रक्षाबंधनालाच बहिणीची मुंडन करून हत्या, प्रियकराचाही मर्डर, राक्षसी भावाचं हादरवणारं कृत्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement