फोनवर बोलली, मग दरवाजा बंद केला... गायत्रीने उचललं टोकाचं पाऊल, गर्ल्स हाॅस्टेलमध्ये पसरली भयाण शांतता!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वीच प्रवेश घेतलेल्या सांगलीच्या गायत्री रेळेकर या 21 वर्षीय विद्यार्थिनीने नैराश्यातून वसतिगृहात...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वीच प्रवेश घेतलेल्या सांगलीच्या गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय-21) या विद्यार्थिनीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात उघडकीस आली, ज्यामुळे हाॅस्टेल परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
फोन ठेवला, रुममध्ये आली अन् संपवलं आयुष्य
गायत्री वसतिगृहाच्या रुम नंबर 54 मध्ये आणखी दोन मैत्रिणींसोबत राहत होती. रक्षाबंधनासाठी ती 8 ऑगस्ट रोजी गावी गेली होती आणि सोमवारी सकाळीच परतली होती. परत आल्यावर ती कोणाशीतरी फोनवर बोलत होती. त्यानंतर ती खोलीत आली आणि तिने आपल्या रुमचा दरवाजा आतून बंद करून घेतला.
advertisement
दुपारी दोनच्या सुमारास गायत्रीची रूममेट परत आली तेव्हा तिला दरवाजा बंद दिसला. तिने अनेकदा आवाज दिला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरून तिने इतर मैत्रिणींना बोलावले. त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, गायत्रीने ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य दिसले.
तातडीने मुलींनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वसतिगृह अधीक्षकांना बोलावले. त्यांनी दरवाजा उघडून पाहिल्यावर, ही गोष्ट खरी असल्याचे समोर आले. लगेच राजारामपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रभारी पोलिस निरीक्षक सागर आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनेची माहिती मिळताच कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वसतिगृहाकडे धावले.
advertisement
कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांची पाणावले डोळे
या घटनेमुळे वसतिगृहातील इतर मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. प्रशासनाच्या सूचनेनुसार, रेक्टरने सर्व विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना धीर दिला. दरम्यान, आत्महत्येची बातमी कळताच सांगलीहून गायत्रीचे कुटुंबीय तात्काळ विद्यापीठात दाखल झाले. आई-वडील आणि बहिणींनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. गायत्रीच्या मैत्रिणींनाही अश्रू अनावर झाले. गायत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शेंडे पार्क येथे नेला जात असताना नातेवाईकांनी सुरुवातीला त्याला विरोध केला.
advertisement
गायत्रीच्या वडिलांचे कापडाचे दुकान आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता तिने गावाहून परत आल्यावर 'मी सुखरूप पोहोचले आहे,' असा फोन वडिलांना केला होता. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास मुलीच्या आत्महत्येची बातमी कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
हे ही वाचा : 'ट्रॅक्टरचा हफ्ता भरायला पैसे नाही',अक्कलकोटच्या शेतकऱ्यांनी कवटाळलं मृत्यूला, उसाचे बिल थकल्याने टोकाचं पाऊल
advertisement
हे ही वाचा : 'रमीझ धर्मांतरासाठी दबाव टाकतोय...', सोनाचा शारिरिक अन् मानसिक छळ, हादरवून टाकणारे शेवटचे शब्द
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 6:47 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
फोनवर बोलली, मग दरवाजा बंद केला... गायत्रीने उचललं टोकाचं पाऊल, गर्ल्स हाॅस्टेलमध्ये पसरली भयाण शांतता!