Budh Nakshatra Gochar: ग्रहांचा राजकुमार 31 जानेवारीला धनिष्ठा नक्षत्रात; 3 राशींना फेब्रुवारीत प्रसिद्धी आणि पैसा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Astrology: बुध ग्रह 31 जानेवारी 2026 रोजी मंगळ ग्रहाच्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाला बुद्धी, वाणी, व्यापार, नोकरी, शिक्षण आणि आर्थिक व्यवहारांचा कारक ग्रह मानलं जातं. तर धनिष्ठा नक्षत्र हे धन, समृद्धी, यश आणि कीर्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे या नक्षत्रात बुधाचं गोचर होणं खूपच शुभ मानलं जातं. या काळात कित्येक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात, विशेषतः आर्थिक बाबतीत मोठे फायदे होण्याची शक्यता आहे.
advertisement
वृषभ - बुधाच्या या गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची जोरदार साथ मिळताना दिसेल. विशेषतः फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील आणि मनावरचं ओझं हलकं होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात किंवा आधी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकतं.
advertisement
वृषभ राशीचे जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, बोनस किंवा प्रमोशनची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही नवीन करार किंवा फायदेशीर व्यवहार होण्याचे योग आहेत. यासोबतच वृषभ राशीचे लोक धार्मिक, आध्यात्मिक किंवा सामाजिक कार्यात अधिक सक्रिय होतील, ज्यामुळे मानसिक समाधानही मिळेल.
advertisement
कन्या - कन्या राशीसाठी हा गोचर विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण बुध हा तुमच्याच राशीचा स्वामी आहे. त्यामुळे धनिष्ठा नक्षत्रातील बुधाचा प्रवेश तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. या काळात तुमची विचारशक्ती अधिक तीव्र होईल आणि निर्णयक्षमता मजबूत बनेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं आणि बुद्धिमत्तेचं कौतुक होईल.
advertisement
कन्या - सामाजिक स्तरावर तुमची ओळख आणि मान-सन्मान वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांसाठी बदल किंवा बदलीही फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि नफा वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील.
advertisement
advertisement
धनू - तुम्ही स्पर्धा परीक्षा दिली असेल किंवा कोणत्यातरी निकालाची वाट पाहत असाल, तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी झालेली ओळख पुढे जाऊन फायदेशीर ठरू शकते. त्या व्यक्तीच्या मदतीने नवीन संधी मिळू शकतात. आधी केलेल्या गुंतवणुकीतून धनु राशीच्या काही लोकांना अपेक्षित नफा मिळण्याचे योग आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










