advertisement

Ajit Pawar Accident : अजित पवारांसोबत शेवटच्या 10 मिनिटांत काय घडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार!

Last Updated:

Ajit Pawar Plane crash Death : एक मोठा स्फोट झाला. त्यानंतर आम्ही धावतच इथं आलो आणि पाहिले की विमानाला आग लागली होती. अखेरच्या 10 मिनिटात...

Ajit Pawar Death What happened in last 10 minutes
Ajit Pawar Death What happened in last 10 minutes
Ajit Pawar Death news : बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघातप्रकरणी प्राथमिक माहिती समोर येत असून, सूत्रांच्या माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड होता, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लँडिंगदरम्यान पायलटने विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या वेळी विमानावरील नियंत्रण सुटल्याचे दिसून आलं, असंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अशातच आता अजित पवारांसोबत शेवटच्या 10 मिनिटात काय घडलं? याची माहिती समोर आली आहे.

मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं...

अजित पवारांचा अपघात मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हे खूप दुःखदायक आहे. जेव्हा विमान खाली उतरत होतं, तेव्हा ते कोसळेल असं वाटलं आणि ते कोसळलंच. त्यानंतर त्यात स्फोट झाला. एक मोठा स्फोट झाला. त्यानंतर आम्ही धावतच इथं आलो आणि पाहिले की विमानाला आग लागली होती. अखेरच्या 10 मिनिटात विमानात पुन्हा चार ते पाच स्फोट झाले, असं प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे.
advertisement

अजित पवार विमानात होते

आणखी लोक येथं आले आणि विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आग खूप मोठी असल्याने लोकांना मदत करता आली नाही. अजित पवार विमानात होते आणि ही आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे. मी हे शब्दांत वर्णन करू शकत नाही, असं प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे.
advertisement

100 फुटांवरुन विमान कोसळलं

विमानाला लागलेली आग इतकी रौद्र होती की, स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शी हतबल झाले होते. प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, "आम्ही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आगीच्या ज्वाळा आणि सतत होणारे स्फोट यामुळे कोणालाही विमानाच्या जवळ जाणे शक्य झाले नाही. त्यातच आम्हाला कळलं की या विमानात खुद्द अजित दादा आहेत... हे सांगतानाही आम्हाला शब्द सुचत नाहीत. वैमानिकाने लँडिगचा प्रयत्न केला असेल पण ते झालं नाही. धावपट्टीवर उतरेल असं वाटत असतानाच जवळपास 100 फुटांवरुन ते कोसळले."
advertisement

अपघाताचे नेमकं कारण काय?

दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Accident : अजित पवारांसोबत शेवटच्या 10 मिनिटांत काय घडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार!
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement