पोलीस असल्याचे सांगून त्याने तपासणीच्या बहाण्याने डिक्कीत ठेवलेले 28 हजार रुपये काढले. गाडीवर मोठ्या प्रमाणात फाइन बाकी असल्याचे सांगत शांतीनगर पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर तो गाडीसह रक्कम घेऊन पसार झाला. तक्रारीनंतर गुन्हेशाखा युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास करून आरोपीची ओळख पटवली.
दुचाकी आणि एका लाखांचा मुद्देमाल जप्त
advertisement
सापळा रचून आरोपी सुधीर लोखंडे याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि 28 हजार रुपये असा एकूण 1.08 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात केली फसवणूक
सरकारी नोकरी हवी असलेल्या तरुणांना लक्ष्य करून ठगबाज टोळीने लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. एवढंच नाही, तर या टोळीने मंत्रालयात बनावट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुलाखती घेऊनच तरुणांना भुलवलं. मंत्रालयासारख्या कडेकोट सुरक्षेच्या ठिकाणी ही फसवणूक घडल्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलं आहे. नागपूरच्या राहुल तायडे यांची 2019 साली लॉरेन्स हेनरी नावाच्या ठकबाजाशी ओळख झाली. लॉरेन्स, त्याची पत्नी शिल्पा आणि इतर साथीदारांनी त्यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 9 लाख 50 हजार रुपयांनी फसवलं. कनिष्ठ लिपिक पदासाठी मंत्रालयातच खोटी मुलाखत घेण्यात आली. खोट्या आयडी कार्ड्सचा वापर करून मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या वेशात आरोपींनी तायडेंची मुलाखत घेतली.2019 ते 2022 दरम्यान टोळीने केवळ राहुलच नव्हे तर अनेक तरुणांना अशाच पद्धतीने गंडवले. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने लॉरेन्स हेनरीला मुंबईतून अटक केली असून त्याची पत्नी शिल्पा आणि आणखी दोन आरोपी फरार आहेत. आतापर्यंतच्या तपासात तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे.