नेमकं प्रकरण काय?
गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना अकोल्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी महिलेची दोन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर आरोपी महिलेसोबत ओळख झाली होती. फिर्यादी महिलेला मूलबाळ होत नसल्याने, नवस करण्याच्या निमित्ताने आरोपी महिलेनं पीडितेला मंदिरात घेऊन जाण्याचे आमिष दाखवलं
advertisement
फिर्यादी महिलाही आरोपी महिलेवर विश्वास ठेवून तिच्यासोबत जायला तयार झाली. मात्र आरोपी महिलेनं तिचा विश्वास घात केला. आरोपी महिलेसह तिचा पती नागेश हिवराळे आणि सुपेश महादेव पाचपोर यांनी संगनमत करून 5 ते 9 मे 2025 दरम्यान फिर्यादी महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा बुलढाणा जिल्ह्यात शोध घेत अटक केली. सध्या तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.