TRENDING:

Crime News : ‘तू मला खूप आवडतेस’, भररस्त्यात हात धरून विवाहितेचा छळ, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Last Updated:

रुग्णालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला भररस्त्यात अडवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारळीबाग परिसरात सायंकाळच्या वेळी एका विवाहित महिलेसोबत घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला भररस्त्यात अडवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‎भररस्त्यात विवाहितेचा छळ; अश्लील मागणी करत हात धरून विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्ह
‎भररस्त्यात विवाहितेचा छळ; अश्लील मागणी करत हात धरून विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्ह
advertisement

‎मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी आरोपी सचिन सोनवणे याने तिचा रस्ता अडवला. तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या घरात येऊ का? असे म्हणत त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने स्पष्ट शब्दांत नकार दिल्यानंतरही आरोपीने बळजबरीने तिचा हात पकडत विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तत्काळ आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली.

advertisement

Success Story : 5 हार्वेस्टर,16 ट्रॅक्टर अन् 2 कोटी कांदा चाळ, कंपनीला लाजवेल असं तरुण शेतकऱ्यांनी केलं!

महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची भावजय तातडीने घराबाहेर आली आणि तिने आरोपीला जाब विचारत समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी सचिन सोनवणे आणि त्याचा साथीदार राजू सोनवणे यांनी उलट महिला आणि तिच्या नातेवाईकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले.

advertisement

यानंतर पीडित महिलेने तात्काळ सिटीचौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन सोनवणे आणि राजू सोनवणे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

‎या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मिसाळ करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : ‘तू मला खूप आवडतेस’, भररस्त्यात हात धरून विवाहितेचा छळ, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल