TRENDING:

हॉलिवूडच्या सिनेमाला लाजवेल असा बँकेवर हल्ला, पैसे नाही तर या कारणासाठी बँकेत लावली आग!

Last Updated:

बँकेला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे कारण मात्र वेगळेच होते. पाच आरोपींमध्ये असलेला हा भरत कदम वैजपुराचाच आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. बँकेची फसवणूक केली म्हणून एकाला अटक झाली. पण या पठ्याने फसवणुकीचे पुरावे नष्ठ करण्यासाठी चक्क बँक स्फोटाने उडवली. अखेरीस पोलिसांनी या बहाद्दराच्या मुसक्या आवळल्या आणि कोठडीत कोंबलंय,
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या इमारतीला रात्री 3 वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागण्याआधी मात्र एका आवाजाने परिसर हादरला होता. बाजूलाच पोलीस ठाणे असल्याने पोलीस सुद्धा धावत आले. अचानक आरडाओरडा सुरू झाल्यामुळे हा आरोपी हा घटनास्थळावरून गाडी सोडून पळून गेला. तर एका आरोपीच्या कपड्यांनी पेट घेतला तरीही तो पळून गेला. पोलिसांनी परिसराची पाहणी केला तेव्हा आरोपींची गाडी सापडली. पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेटची तपासणी केली असता आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले.

advertisement

...म्हणून बँकेला लावली आग

बँकेला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे कारण मात्र वेगळेच होते. पाच आरोपींमध्ये असलेला हा भरत कदम वैजपुराचाच आहे. भरतने महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून बनावट कागदपत्रे देऊन 65 लाखाचं कर्ज घेतलं होतं. भरतने बनावट कागदपत्र दिल्याचं बँकेच्या लक्षात आलं त्यानंतर बँकेनं रितसर पोलिसांत तक्रार केली आणि भरतला अटक झाली. अटक झाल्यानंतर तो जामिनावरही सुटला. पण त्याने दिलेली बनावट कागद ही बँकेतच होती. त्यामुळे बँकेतून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मित्रांना पैसे देऊन प्लॅन केला. भरतने महाराष्ट्र बँकेचं शटर स्फोटकं लावून उडवली. त्यानंतर बँकेच्या कार्यालयात पेट्रोल टाकून आग लावली.

advertisement

एक आरोपी फरार

भरत कदम आणि त्याच्या जोडीदारांनी बँक लुटीचा देखावा करायचा होता आणि कागदपत्रे पेटवायची होती. पण सुदैवाने बँकेत असलेली रोकड आणि कागदपत्रे जळाली नाही. उलट एक आरोपी पेटला आणि एकाचा चेहरा भाजला. पेटलेला आरोपी अजून सापडला नाही पोलीस शोध घेत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
हॉलिवूडच्या सिनेमाला लाजवेल असा बँकेवर हल्ला, पैसे नाही तर या कारणासाठी बँकेत लावली आग!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल