7 महिन्यांत तिघांची फसवणूक, 2 लाखांवर मारला डल्ला
या संदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस प्रशासन सांगतं की, मागील 7 महिन्यांत तिघांचा सायबर फसवणूक झाली आहे. त्यामध्ये 1 लाख 90 हजारांची फसवणूक करण्यात आली होती. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 94 हजारांची रक्कम परत मिळवली आहे.
advertisement
सायबर चोरटे कशी करतात फसवणूक?
पहिल्यांदा तुमच्या व्हाॅट्सअपवर अनोळखी नंबरवरून काही लिंक्स येतात. त्यामध्ये एपीके फाइल्स स्वरुपात ॲप्स दिले जातात. या लिंक्स आणि ॲप्स दिसताना आपल्याला सुरक्षित वाटतात. शादी का आमंत्रण किंवा वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड, एसबीआय रिवाॅर्ड्स, पीएम किसान लिस्ट... अशा नावांनी या फाइल्स येतात. तुम्ही त्यावर क्लिक केलात किंवा डाऊनलोड केलात, तर तुमच्या व्हाॅट्सअप हॅक होतो. त्यानंतर तुमच्या गुगल पे, फोन पे आणि बँकिंग ॲप्सवर ताबा मिळवला जातो आणि तुमचं बँक खातं पूर्णपणे रिकामं होतं. इतकंच नाहीतर तुमच्या मोबाईलमधील काॅन्टॅक्ट लिस्टवरून इतरांना त्या लिंक्स पाठवून त्यांचीही फसवणूक केली जाते.
कोणती काळजी घ्यावी?
- व्हाॅट्सअपवर आलेली कोणतीही एपीके फाइल्स किंवा लिंक्स क्लिक करू नका. कोणतंही ॲप डाऊनलोड करू नका.
- जर तुमच्याकडून चुकून क्लिक झालं किंवा डाऊनलोड झालं की, तुमचा मोबाईल लगेच एरोप्लेन मोडवर टाका किंवा आलेली फाईल किंवा लिंक्स लगेच डिलीट करा.
- व्हाॅट्सअपच्या सेटिंगच्या स्टोअरेज अँड डेटामध्ये जाऊन जाऊन ऑटो डाऊनलोड बंद करून ठेवा. अनोळखी नंबरवरील व्हिडीओ काॅल्स किंवा मेसेज वाचू नका, ते थेट ब्लाॅक करा.
- व्हाॅट्सअप हॅक होण्यापासून वाचायचं असेल तर टू स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा. तसेच सार्वजनिक व्हायफाय वापरताना कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.
फसवणूक झाली तर काय कराल?
तत्काळ 1930 किंवा 1945 या नंबरवर संपर्क साधा. तसेच cybercrime.gov.in या वेबसाइटवर जाऊन तक्रार नोंदवा. शक्य नसेल तर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
हे ही वाचा : Satara Crime: 'चल, साहेबांना लुटूया', 40 हजारांच्या कर्जासाठी 2 मित्रांनी रचला खतरनाक प्लॅन; घेतला कोयता आणि...
हे ही वाचा : हातपाय बांधले, विहिरीत टाकलं, प्रेम प्रकरणातून मुलीसह तिच्या प्रियकराला बापाने संपवलं, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!