हातपाय बांधले, विहिरीत टाकलं, प्रेम प्रकरणातून मुलीसह तिच्या प्रियकराला बापाने संपवलं, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

Last Updated:

Crime in Nanded: प्रेमप्रकरणातून बापाने पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून दोघांचे मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18
News18
नांदेड: प्रेमप्रकरणातून बापाने पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून दोघांचे मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे सोमवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक केली आहे.
संजीवनी सुधाकर कमळे (१९) आणि लखन बालाजी भंडारे (१९) अशी मृतांची नावे आहेत. संजीवनी ही विवाहित असून लखन अविवाहित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी आणि लखन यांचे प्रेमसंबंध होते. सोमवारी लखन हा संजीवनीच्या घरी भेटायला गेला होता. यावेळी तिच्या सासरच्या लोकांनी दोघांना आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिले. त्यानंतर त्यांनी लखनला पकडून ठेवले आणि संजीवनीच्या वडिलांना, मारुती लक्ष्मण सुरणे यांना बोलावले.
advertisement

हातपाय बांधून विहिरीत फेकले

मुलीचं प्रेम प्रकरण समजल्यानंतर लक्ष्मण सुरणे तातडीने मुलीच्या सासरी आले. त्यांनी मुलीला अन् तिच्या प्रियकराला गोळेगाव येथून बोरजुन्नी गावाकडे नेले. वाटेत करकाळा शिवारात त्यांनी दोघांचेही हातपाय बांधले आणि त्यांना एका विहिरीत फेकून दिले. यानंतर आरोपी मारुती सुरणे याने स्वतःहून उमरी पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली.
advertisement

तिघांना अटक

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. सायंकाळी संजीवनीचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला, तर लखनच्या मृतदेहाचा शोध सुरू होता. या प्रकरणी उमरी पोलिसांनी मारुती सुरणे, त्याचा भाऊ माधव सुरणे आणि वडील लक्ष्मण सुरणे यांना अटक केली आहे. उमरी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हातपाय बांधले, विहिरीत टाकलं, प्रेम प्रकरणातून मुलीसह तिच्या प्रियकराला बापाने संपवलं, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
Next Article
advertisement
Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement