Satara Crime: 'चल, साहेबांना लुटूया', 40 हजारांच्या कर्जासाठी 2 मित्रांनी रचला खतरनाक प्लॅन; घेतला कोयता आणि...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Satara Crime: ही गोष्ट आहे 2 चोरट्यांची. दोघेही एकाच गावातील मित्र होते. एकजण पुण्यात काम करत होता, तर दुसरा लोणंदमधील एका कंपनीत काम करत होता. मात्र...
सातारा : ही गोष्ट आहे 2 चोरट्यांची. दोघेही एकाच गावातील मित्र होते. एकजण पुण्यात काम करत होता, तर दुसरा लोणंदमधील एका कंपनीत काम करत होता. मात्र, पुण्यात राहणाऱ्या मित्रावर 40 हजारांचं कर्ज होतं. ते त्याला फेडायचं होतं. त्यामुळे त्याने लोणंदमध्ये काम करणाऱ्या मित्राला फोन करून विचारलं की, "पैशांची जुळणा होईल का? कुठल्या बँकेतून कर्ज मिळेल का? अनेकांची देणी द्यायची आहेत." तर लोणंदचा मित्र म्हणाला की, "कशाला कर्ज काढतोयस. आमच्या कंपनीच्या साहेबालाच लुटूया, म्हणजे तुझं कर्ज फिटेल आणि मलाही पैसे मिळतील." या 2 मित्रांच्या डोक्यात लुटीचा कट शिजू लागला. (Satara Crime)
असा रचला लुटीचा प्लॅन
या दोघांनी पुण्यात आणखी एका मित्राला त्यांचा प्लॅन सांगितलं. त्यानेही संमंती दर्शवली. तिघांनी मिळून आणखी 5 जण साथीदार गोळा केले. लोणंदच्या कंपनीत काम करणाऱ्या मित्राने साहेबांवर (लेबर काॅन्ट्रॅक्टर कृष्णा गायकवाड) नजर ठेवली. त्यांनी येण्याचा आणि जाण्याच्या वेळा, त्यांच्याकडे किती रोकड असते, याचीही माहिती घेतली. सगळ्यांचा प्लॅन प्रत्यक्षात उतरणार होता. त्यादिवशी कृष्णा गायकवाड कंपनीच्या दिशेने निघाले होते. फलटण तालुक्यातील तरडगावाजवळ असणाऱ्या रेल्वे फाटकावर त्यांना अडवले. कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याजवळी 5 लाख 9 हजारांची रोकड लुटली.
advertisement
चौकशीतच आरोपी जाळ्यात सापडला
या लुटीच्या घटनेचा कोणताच पुरावा नव्हता. पोलिसांकडे तपासाची सुत्रे आली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी घटनास्थळी सुरू असलेले सर्व मोबाईल तपासले. मोबाईलधारकांची चौकशी केली. त्यात एकावर संशय आला. तो त्याच कंपनीत कामला होता. त्यांनी त्या कामगाराला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्याने संपूर्ण कट पोलिसांसमोर उलगडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
advertisement
काय करणार होते त्या पैशांचं?
हा चोरीचा पैसा आठ जणांमध्ये समान वाटून घेतला जाणार होता. लुटीनंतर या सर्वांना पुण्यात जाऊन 1 लाखांची कपडे खरेदी केली. आता पैशा वाटला जाणार इतक्यात पोलिसांच्या जाळ्यात सर्व जण सापडले. चोरीच्या पैशांचा आनंद फार काळ टिकला नाही. पोलिसांनी उरलेली 4 लाखांची रक्कम जप्त केली. फक्त 40 हजारांच्या कर्जासाठी लुटीचा कट रचला आणि आठ जणांना तुरुंगाची हवा खाली लागली.
advertisement
हे ही वाचा : भरधाव वेगाने कार आली, धडक दिली अन् 15Km फरपटत नेलं; मुलाच्या डोळ्यांसमोर 70 वर्षांच्या आजींचा भयानक मृत्यू!
हे ही वाचा : Ratnagiri News: मार्क्स कमी पडले, आई ओरडली, रागाच्या भरात 'या' विद्यार्थ्याने असा केला स्वतःचा शेवट!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 11:14 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Satara Crime: 'चल, साहेबांना लुटूया', 40 हजारांच्या कर्जासाठी 2 मित्रांनी रचला खतरनाक प्लॅन; घेतला कोयता आणि...


