Ratnagiri News: मार्क्स कमी पडले, आई ओरडली, रागाच्या भरात 'या' विद्यार्थ्याने असा केला स्वतःचा शेवट!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Ratnagiri News: रेहान असलम कापडे (वय-15) हा इयत्ता दहावीमध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. त्याला दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत...
रत्नागिरी : इयत्ता दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत गुण कमी मिळाले. यावरून आई मुलावर ओरडली, या रागातून 15 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली आहे. यासंदर्भात मुलाच्या मामाने स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुण कमी मिळाले अन् आई ओरडली
मिळलेल्या माहितीनुसार रेहान असलम कापडे (वय-15, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, रत्नागिरी) हा इयत्ता दहावीमध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. त्याला दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते. मार्क्स कमी मिळाले म्हणून रेहानची आई त्याच्यावर ओरडली होती. त्यामुळे मुलाला राग आला होता. या रागातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री 8 वाजता घडली.
advertisement
मामाने दिली पोलिसांत फिर्याद
यासंदर्भात रेहानचा मामा अश्रफ अली ईसाक पागारकर (वय-64, रा. एमजी रोड, भाजी मार्केट, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची बहीण नसरीन असलम कापडे यांचा मुलगा रेहान हा इयत्ता दहावीत एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. त्याचा दहावीच्या घटक चाचणी परीक्षेत मार्क्स कमी मिळाले होते, त्यावरून आई ओरडली होती, त्याच रागातून रेहानने गळफास घेत स्वतःला संपवले.
advertisement
हे ही वाचा : भरधाव वेगाने कार आली, धडक दिली अन् 15Km फरपटत नेलं; मुलाच्या डोळ्यांसमोर 70 वर्षांच्या आजींचा भयानक मृत्यू!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 9:30 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Ratnagiri News: मार्क्स कमी पडले, आई ओरडली, रागाच्या भरात 'या' विद्यार्थ्याने असा केला स्वतःचा शेवट!


