TRENDING:

लॉज प्रेयसी आणि मनी! प्रेयसीनं छळलं अन् दीपकने आयुष्य संपवलं, संभाजीनगरमधील घटना

Last Updated:

प्रेमसंबंधातील तणाव आणि पैशांच्या वादातून एका 51 वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधातील तणाव आणि पैशांच्या वादातून एका 51 वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (20 जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वेरूळ (ता. खुलताबाद) येथील हॉटेल शिवसेवा रेसिडेन्सी लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे घडली.
News18
News18
advertisement

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव दीपक भाऊराव खरात (वय 51, रा. बनेवाडी, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर) असे आहे. ते वाळूज एमआयडीसीतील एका खासगी ऑटोमोबाईल कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी त्यांचा मुलगा आकाश खरात (वय 27) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime: विकृतपणाचा कळस! मुंबईत 20 वर्षीय तरूणाने कुत्र्याच्या पिल्लासोबत केले अश्लील वर्तन

advertisement

तक्रारीनुसार, दीपक खरात यांचे जयश्री राजू बनकर (वय 46, रा. गौतमनगर, आसेफिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) या महिलेशी दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. या संबंधांमुळे त्यांच्या घरात सातत्याने वाद होत होते. कुटुंबीयांनी अनेकदा जयश्रीसोबतचे संबंध तोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र दीपक खरात हे तिची भेट घेतच राहिले. इतकेच नव्हे, तर आपल्या कामाचे पैसेही ते तिला देत असल्याने ते कायम आर्थिक अडचणीत राहत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

‎मंगळवारी दीपक खरात हे जयश्री बनकर हिच्यासोबत वेरूळ येथील शिवसेवा लॉजमध्ये गेले होते. लॉजच्या खोलीत असताना जयश्रीने त्यांच्याकडे पैशांची मागणी करत ब्लॅकमेल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मानसिक दबावाला कंटाळून दीपक खरात यांनी तिच्या समोरच गळफास घेऊन आत्महत्या केली, असे नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी जयश्री बनकर हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
लॉज प्रेयसी आणि मनी! प्रेयसीनं छळलं अन् दीपकने आयुष्य संपवलं, संभाजीनगरमधील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल