समोर आलेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका तरुणीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवले म्हणून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुलीचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी ही मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव परिसरात राहणारा होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोरेगाव तलावाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मुलीचा प्रियकर भूषण पाटील आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली.
advertisement
माराहाण करताना व्हिडीओ काढला
तरूणीने प्रतिक वाघने आपल्याला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवल्याचे प्रियकर भूषण पाटीलला सांगितले.त्यानंतर संतापलेल्या प्रियकराने मित्रांसह थेट प्रतिकला गाठले आणि मेसेज का पाठवला म्हणून वाद घालण्यास सुरूवात केला. वाद इतका टोकाला गेली का, प्रियकराने मित्रासंह मिळून मृत प्रतिकला मारण्यास सुरूवात केली. विकृतीचा कळस म्हणजे ज्या वेळी प्रतिकला मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. या मारहाणीत प्रतिक गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या प्रतिकला रस्त्यावर टाकून आरोपींनी पळ काढला. स्थानिकांनी तात्काळ प्रतिकला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र मारहाण एवढी जबर होती की, प्रतिकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण
सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तुळींज पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
