ऋषिकेश : गेल्या काही दिवसात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
गौतम अरोडा असे नदीत उडी घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. गौतम हा ऋषिकेशच्या मनीराम मार्ग येथील रहिवासी होता. तसेच तो डेहराडून येथील एका प्रतिष्ठित खासगी विद्यापीठात शिक्षण घेत होता. हरिद्वार रोड येथील 72 पायऱ्या घाट याठिकाणी ही घटना घडली.
advertisement
आत्महत्येपूर्वी पाठवला भावनिक संदेश -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमने गंगा नदीत उडी मारण्यापूर्वी आपल्या मोबाईलमधून आपल्या भावाला एक भावनिक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्याने पाठवले होते की, ‘भाऊ, आई-वडिलांची काळजी घेशील, मी आत्महत्या करतोय’.
यावरुन त्याने आत्महत्या करण्याचे ठरवले होते, असे स्पष्ट दिसत आहे. तसेच गंगा नदीत उडी घेण्यापूर्वी त्याने आपला मोबाइल हा मंदिराच्या बाहेर ठेवला होता. या घटनेची माहिती घाटावर उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच त्यांनी या तरुणाचा शोध घेतला. अद्यात त्याचा शोध लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
टॉयलेटमध्येही मोबाईलचा वापर, हा मोठा धोका, जाणून घ्या, या सवयीमुळे काय फटका बसू शकतो?
त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अभ्यासात चांगला होता आणि त्याला कोणताही मोठा ताण नव्हता. त्यामुळे त्याने हे पाऊल कोणत्या कारणातून उचलले हे लक्षात येत नाहीये. पोलीस याप्रकरणी तपास करत असून यामागे काय कारण आहे, याचा शोध घेत आहे.
पोलिसांचे आवाहन -
दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा मानसिक आरोग्य आणि आत्महत्येची कारणे यावर चर्चा होत आहे. जर एखादा व्यक्ती तणावात आहे किंवा मानसिक रुपाने संघर्ष करत आहे. तर त्याला कुटुंबीयांशी किंवा आपल्या मित्रांशी संपर्क करायला हवा.