TRENDING:

आई, वडील, बहीण आणि आत्या... सगळ्यांची केली हत्या; यूट्यूब व्हिडीओ पाहून केला कांड, आता...

Last Updated:

तिरुअनंतपुरममध्ये 2017 मध्ये कैदेल राजाने आई, वडील, बहिण आणि आत्याची निर्दयी हत्या केली. यासाठी त्याने युट्यूबवरून खून कसा करायचा ते पाहिलं, डमी बनवून सराव केला आणि नंतर...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे 2017 मध्ये स्वतःच्या आई-वडील, बहीण आणि आत्या यांची निर्घृण हत्या करणाऱ्या कॅडेल जेन्सन राजाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला आणि म्हटलं की 35 वर्षीय कॅडेलला आता आयुष्यभर तुरुंगात राहावं लागणार आहे. कोर्टाने त्याच्यावर 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे, जो मृतांच्या नातेवाईकाला, जोस सुंदरम यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
Crime News
Crime News
advertisement

एकापाठोपाठ चार खून, मग पुरावे नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न

हा गुन्हा एप्रिल 2017 मध्ये तीन दिवसांत घडला. कॅडेलने पहिल्यांदा त्याचे आई-वडील आणि बहिणीला त्याच्या खोलीत बोलावलं आणि सांगितलं की त्याला त्यांना स्वतः बनवलेला एक व्हिडिओ गेम दाखवायचा आहे. जेव्हा ते आत आले, तेव्हा त्याने पूर्वी खरेदी केलेल्या मोठ्या आणि तीक्ष्ण तलवारीने (माचेटी) त्या तिघांनाही मारून टाकलं. खालच्या मजल्यावर राहणाऱ्या त्याच्या आत्याला दोन दिवस काहीच कळलं नाही, कारण तिला नीट दिसत नव्हतं. नंतर त्याने तिलाही मारलं.

advertisement

आग लावल्यावर चेन्नईला पळाला, मग स्वतःहून परतला

हत्ये केल्यानंतर कॅडेलने घराला आग लावली, जेणेकरून मृतदेह जळून जातील आणि पोलिसांना कोणतेही पुरावे मिळणार नाहीत. पण आग नियंत्रणात आली नाही आणि तो घाबरून तिथून पळून गेला. तो सुमारे 800 किलोमीटर दूर असलेल्या चेन्नईला पोहोचला. तिथे टीव्हीवर बातम्या पाहिल्यानंतर त्याला समजलं की आता प्रकरण गंभीर झालं आहे. यानंतर तो स्वतःहून परत तिरुवनंतपुरममध्ये आला आणि पोलिसांच्या हाती लागला.

advertisement

'आध्यात्मिक प्रयोगा'चं नाटक, पण कोर्टाने मान्य केलं नाही

कॅडेलने सुरुवातीला दावा केला होता की तो 'ॲस्ट्रल प्रोजेक्शन' म्हणजे आत्मा शरीराबाहेर काढण्याचा प्रयोग करत होता. त्याने सांगितलं की मृत्यू झाल्यावर आत्मा शरीरातून कसा बाहेर पडतो हे त्याला बघायचं होतं. पण तपासात पोलीस आणि डॉक्टरांना समजलं की, ते फक्त एक नाटक होतं. तो पूर्णपणे मानसिकदृष्ट्या ठीक होता आणि त्याने हे सगळं एका पूर्ण योजनेचा भाग म्हणून केलं होतं.

advertisement

ऑनलाइन व्हिडिओतून प्रेरणा घेऊन हत्येसाठी बनवला होता डमी

तपासात उघड झालं की, कॅडेलने युट्युबवर गळा चिरण्याचे आणि हत्येचे व्हिडिओ पाहिले होते. त्याने गुगलवर हत्येच्या पद्धतीही शोधल्या होत्या. त्याने त्याच्या आई-वडिलांसारखे दिसणारे डमी बनवले होते आणि आधीच हत्येचा सराव केला होता. हे डमी नंतर जळालेल्या अवस्थेत घरातून सापडले. पोलिसांच्या सायबर सेलला हे सगळे पुरावे त्याच्या लॅपटॉपमधून मिळाले.

advertisement

मनोरुग्णतेची मागणी फेटाळली, कोर्ट म्हणाले - पूर्ण प्लॅन करून खून केला

खटल्यादरम्यान कॅडेलने कोर्टात दावा केला की, तो स्किझोफ्रेनिया (मनोरोग) ने त्रस्त आहे आणि त्याला उपचारांची गरज आहे. पण वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे दिसून आलं की तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी आहे. कोर्टाने मान्य केलं की त्याने विचारपूर्वक आणि महिन्याभराच्या तयारीनंतर हे सगळं केलं आणि मनोरुग्णतेची मागणी फक्त शिक्षेपासून वाचण्याचा एक मार्ग होता.

घरातील एकटेपणा आणि कुटुंबासोबतचा राग बनला हत्येचं कारण

सरकारी वकिलांनी सांगितलं की कॅडेल 2009 मध्ये विदेशातील इंजिनीअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून परतला होता. यानंतर त्याला घरात एकटेपणा जाणवत होता आणि हळूहळू त्याला त्याच्या कुटुंबाचा तिरस्कार वाटू लागला होता. त्याला असं वाटत होतं की त्याचे आई-वडील त्याला त्याच्या इच्छेनुसार जगू देत नाहीत. त्याला मित्रांना भेटण्याची मुभा मिळत नव्हती आणि त्याला त्याच्या वडिलांची जीवनशैलीही आवडत नव्हती.

हे ही वाचा : 'या' पोरीला पिस्तूलसोबत Reel बनवणं पडणार महागात; VIDEO झाला व्हायरल, पोलिसांनी घेतली दखल

हे ही वाचा : रोज नवी बाईक, ब्रँडेड कपडे! पोलिसांनी आली शंका, चौकशी करताच स्टायलिश चोरांचा पर्दाफाश, वाचा सविस्तर

मराठी बातम्या/क्राइम/
आई, वडील, बहीण आणि आत्या... सगळ्यांची केली हत्या; यूट्यूब व्हिडीओ पाहून केला कांड, आता...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल