समलैंगिक संबंधाच्या कारणातूनच माऊलीची आरोपींनी हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मुख्य आरोपी सागर गव्हाणे याचे गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होती. याची माहिती माऊलीला समजली होती. माऊली गावात याबाबत वाच्यता करेन, अशी भीती आरोपींना होती. याच भीतीपोटी आरोपींनी माऊलीचा खून करायचं ठरवलं. जवळपास दीड महिन्यांपूर्वी दोघांनी हत्येचा कट रचला होता. दोघांनी संगनमत करून ६ मार्चला माऊलीची हत्या केली. यानंतर आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत मृतदेहाचे तुकडे केले. मुंडकं धडापासून वेगळं केलं आणि बॉडीचे सर्व पार्ट दोन वेगवेगळ्या विहिरीत टाकले.
advertisement
घटनेच्या रात्री नक्की काय घडल?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर गव्हाणे आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने घटनेच्या रात्री ६ मार्चला माऊलीला लुडो गेम खेळायचा बहाणा करून बोलवून घेतलं होतं. यानंतर दोघांनी माऊलीला गोड बोलून घोडनदी पात्रात असलेल्या विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीजवळ घेऊन गेले. इथं गेल्यानंतर आरोपींनी अचानक माऊलीचा गळा आवळायला सुरुवात केली. काही कळायच्या आत आरोपींनी डाव साधल्याने माऊली स्वत:ला वाचवू शकला नाही. माऊलीची हत्या केल्यानंतर आरोपींनी धारदार कटरने माऊलीचं शीर धडावेगळं केलं. यानंतर त्यांनी माऊलीचे इतर अवयवाचेही तुकडे केले.
ओळख पटू नये म्हणून त्यांनी माऊलीचं धड आणि शीर वेगवेगळ्या पोत्यात भरलं आणि दोन्ही पोते दोन वेगवेगळ्या विहिरीत टाकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी माऊलीचा मृतदेह विहिरीत सापडला, त्यादिवशी आरोपी देखील तिथेच होता. पोलिसांच्या हालचाली आणि गावकऱ्यांची चर्चा ते स्वत: ऐकत होते. पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकला नाही. ज्यादिवशी माऊलीची हत्या झाली, त्यादिवशी दोन्ही आरोपींसह माऊलीचा फोन एकाच वेळी बंद झाला होता. ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्या अँगलने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
