मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे जात होती.या दरम्यान रस्त्यात अचानक त्यांची दुचाकी बंद पडली होती.त्यामुळे दोघेही गाडी रस्त्याच्या कडेला लावून दुरूस्ती करत होते. या दोघांना पाहून चंद्रपूरहून कारवाकडे जाणारा वनरक्षक रंजीत दुर्योधन त्यांच्याजवळ थांबला.यावेळी रंजीत दुर्योधनने अल्पवयीन मुलीला पुढच्या गावापर्यंत सोडतो,असे सांगितले.
यावर मुलीचा होकार येताच त्याने तिला थेट गाडीवर बसवून चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात घेऊन गेला.जंगलात नेऊन त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता.त्यानंतर अप्लवयीन मुलगी देखील कशी बशी आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली आणि तिने झालेला संपूर्ण घटनाक्रम आपल्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी बल्लारपूर पोलिस ठाणे गाठत आरोपी वनरक्षकाबाबत तक्रार दाखल केली.
advertisement
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काल सुत्र हलवत आरोपी वनरक्षकाला गोंदिया येथून अटक केली आहे.रंजीत दुर्योधन असे आरोपी वनरक्षकाचे नाव आहे.पोलिसानी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीत करीत आहेत.