समृद्धी महामार्गावर डॉक्टर दांपत्यांची गाडी अडवून 18 तोळे सोनं दरोडेखोरांनी लुटले असल्याची घटना संभाजीनगर हद्दीत घडली. या प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र समृद्धीवर रात्री पडलेल्या या दरोड्यांना आता प्रवास करणाऱ्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने अनेक जण रात्रीच प्रवास करायला पसंती देत आहेत. मात्र दरोड्याच्या घटनेने दहशतीचे वातावरण झालं आहे.
advertisement
काय घडलं त्या भयाण रात्री?
डॉ. श्रावण शिंगणे व त्यांच्या पत्नी चैताली, असे दोघे पालघर येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. 29 एप्रिलला ते भावाच्या लग्नासाठी मेहकरला गेले होते. समारंभ आटोपून 2 मे रोजी सायंकाळी श्रावण, पत्नी चैताली, मुलगा श्रीराज व आई मीना निंभोरे कारने महामार्गावरून परत निघाले होते. रात्री 10 वाजता करमाड पोलिस ठाण्याची हद्द संपताच शेंद्रा परिसरात एका सुसाट कारचालकाने त्यांना ओव्हरटेक केले. ओव्हरटेक केलेल्या कारने त्यांच्या कारसमोर आपली कार उभी केली. कारमधून चार जणांनी उतरून विमा कंपनीचे लोक असल्याचे सांगितले. बोलण्याच्या ओघात एकाने कारची चावी काढून घेतली. डॉ. श्रावण यांना मारहाण करून स्टिअरिंगवर डोके आदळले. त्यांच्या पत्नी व सासूचे दागिने, मोबाइल हिसकावले. दरोडेखोरांनी महिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून त्यांनी आपल्या जवळील ऐवज दिला.
दरोडेखोरांनी काय लुटले?
दरोडेखोरांनी 1 लाख रुपयांचे दीड तोळ्याचे सोन्याचे मणी, मंगळसूत्र, 3 लाख रुपयांची चार तोळ्यांची सोन्याची पोत, दीड लाख रुपयांचा लक्ष्मी हार, दीड लाख रुपयांची लहान पोत, 4 लाखांची मोठी पोत, 12 हजारांचा मोबाइल असा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला.
