चौथ्या मजल्यावर एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला होता. नास्बू खातून (वय अंदाजे 30 वर्षे) असं तिचं नाव होतं. तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूचे अनेक वार होते. पोलिसांनी घराची पाहणी केली, पण चोरांनी घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा त्यांना मिळाला नाही. ना कोणतं कुलूप तुटलेलं होतं, ना घरात झटापटीची कोणतीही चिन्हं होती. कुटुंबीयांची चौकशी केली असता, त्यांची उत्तरं गोंधळात टाकणारी होती.
advertisement
पोलिसांना लगेच रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांची आठवण झाली. रात्रभरचे फुटेज तपासले असता, बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीची घरात ये-जा दिसली नाही. त्यामुळे आता संशयाची सुई घरात राहणाऱ्या लोकांवरच वळली.
पतीने आणली दुसरी पत्नी
अन्सार नावाच्या व्यक्तीला घरात दोन बायका होत्या, एक अफसरी खातून आणि नास्बू खातून. पोलिसांनी अफसरीला कठोरपणे विचारपूस केली, तेव्हा तिने खुनाची कबुली दिली. अफसरीने सांगितलं की, 16 वर्षांपूर्वी तिचं लग्न अन्सारसोबत झालं होतं. त्यांना 14, 13 आणि 6 वर्षांची तीन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वी, अन्सारने अफसरीला न सांगता हैदराबादमध्ये नास्बूशी दुसरं लग्न केलं. हैदराबादमध्ये एक वर्ष राहिल्यानंतर तो नास्बूला दिल्लीला घेऊन आला. हे सत्य जेव्हा अफसरीला कळलं, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं.
पती दुबईत, दोन बायकांमध्ये सततची भांडणं
काही काळानंतर अन्सार दोन्ही पत्नींना सोडून नोकरीसाठी दुबईला निघून गेला. घरात फक्त अफसरी आणि नास्बू या दोन बायका राहिल्या. त्यांच्यात सतत भांडणं होत होती. अफसरीला वाटायचं की अन्सार नवीन पत्नीकडे जास्त लक्ष देतो. एकदा नास्बूने अफसरीच्या मुलाला थोबाडीत मारलं होतं. तेव्हापासून तिच्या मनात असलेला मत्सर आणि राग अधिकच वाढला होता.
पहाटे 2 वाजता किचनमधून चाकू घेतला आणि…
1 जूनच्या रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात अफसरीला रात्रभर झोप लागली नाही. पहाटे 2 वाजता ती उठली, किचनमधून चाकू घेतला आणि झोपलेल्या नास्बूवर हल्ला केला. तिने नास्बूच्या गळ्यावर आणि पोटावर वारंवार वार करून तिचा जीव घेतला. खुनानंतर, अफसरीने तिच्या मुलाला एक खोटी कहाणी सांगितली की, घरात चोर घुसले आणि त्यांनी नास्बूला मारलं. पण पोलिसांना फसवणं इतकं सोपं नव्हतं. अफसरीच्या खोट्या गोष्टींचा लवकरच पर्दाफाश झाला आणि आता तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : बाप रे! नशेच्या व्यसनासाठी आईनेच विकलं लेकीला, डोळे अन् कातडीचे मिळाले 'इतके' पैसे
हे ही वाचा : खेळ खल्लास! ऑनलाईन गेममध्ये हरले 5 लाख, पती-पत्नीला आलं टेन्शन, रात्री खोलीत गेले अन्...